Hardik Pandya Natasa Stankovic saam tv
Sports

Hardik Pandya Natasa Stankovic: हार्दिकला बर्थडे विश सोडाच, नताशा करतेय एल्विश यादवसोबत एन्जॉय; स्वतः केला इन्स्टावर Video शेअर

Hardik Pandya Natasa Stankovic: हार्दिक पंड्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे फार चर्चेत आहे. ११ ऑक्टोबर रोजी पंड्याचा वाढदिवस होता. हार्दिकच्या वाढदिवसाच्या दिवशी नताशाने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीये.

Surabhi Jayashree Jagdish

शुक्रवारी म्हणजे ११ ऑक्टोबर रोजी टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचा वाढदिवस होता. यावेळी पंड्याने त्याचा ३१ वा वाढदिवस साजरा केला. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पंड्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे फार चर्चेत आहे. जुलै महिन्यामध्ये हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक यांनी त्यांच्या घटस्पोटाची घोषणा केली होती. दरम्यान हार्दिकच्या वाढदिवसाच्या दिवशी नताशाने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीये.

हार्दिक पंड्या आणि नताशा एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर त्याच्या वाढदिवशी नताशा खास पोस्ट करून त्याला विश करणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं. शुक्रावारी नताशाने सोशल मिडीयावर एक पोस्ट केली खरी मात्र या पोस्टमध्ये ती एका व्यक्तीसोबत दिसून येतेय. या व्यक्ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर एल्विश यादव आहे.

नताशाने हार्दिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत!

हार्दिक आणि नताशा या दोघांनी २ महिन्यांपूर्वी चार वर्षांचं त्यांचं नातं संपुष्टात आणलं. अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर 18 जुलै रोजी दोघांनी एका पोस्टच्या माध्यमातून घटस्फोटाची अफवा खरी असल्याचं समोर आलं. या घटनेनंतर नताशा सर्बियाहून मुंबईत परतल्यानंतर हार्दिकने नुकतीच मुलगा अगत्स्याची भेट घेतली. तर आता तिने एल्विश यादवसोबत एक रील पोस्ट केलं आहे. मात्र यावेळी हार्दिकच्या वाढदिवशीही नताशाचा कोणतीही पोस्ट केली नाही.

नताशा हार्दिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल अशी चाहत्यांची अपेक्षा होती, मात्र तिने त्याच दिवशी एल्विश यादवसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला. एल्विश आणि नताशाचे एक गाणं नुकतंच रिलीज झालंय. याचसाठी नताशाने ही पोस्ट केली. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिलंय, 'Vibin' On A Whole New Level.

जुलैमध्ये दोघांनी घेतला घटस्फोट

जुलै महिन्यात हार्दिक पांड्याने इन्टाग्राम पोस्ट करत घटस्फोटाच्या चर्चेवर शिक्कामोर्बत केलं होतं. हार्दिकने 2020 मध्ये दुबईमध्ये नताशाला प्रपोज केलं होतं. यानंतर 31 मे 2020 रोजी लॉकडाऊन दरम्यान या दोघांनी लग्न केलं होतं. 30 जुलै 2020 रोजी नताशाने अगस्तला जन्म दिला. मात्र ४ वर्षांच्या या काळानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT