kuldeep yadav Twitter
Sports

Ind vs Aus: शेन वाॅर्नच्या 'बाॅल ऑफ द सेंच्यूरी'ला टक्कर देणारा कुलदीपचा 'ड्रीम बाॅल' पाहीलात का? - VIDEO

Kuldeep yadav Dream ball: कुलदीप यादवने टाकलेल्या एका चेंडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Kuldeep Yadav: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना सुरु आहे.

हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव २६९ धावांवर संपुष्ठात आणला आहे.

दरम्यान कुलदीप यादवने टाकलेल्या एका चेंडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

रोहित शर्मा कुलदीप यादववर विश्वास दाखवून त्याला संधी देत आहे. त्याने देखील विश्वास सार्थ ठरवत चांगली कामगिरी केली आहे. त्याने या डावात ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज बाद केले. दरम्यान अॅलेक्स कॅरीला बाद केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

तर झाले असे की, ३९ वे षटक टाकण्याची जबाबदारी कुलदीप यादवला दिली गेली होती. या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने अॅलेक्स कॅरीला पॅव्हेलियनची वाट दाखवली.

लेग स्पिन गोलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादवने डाव्या हाताच्या फलंदाजाला लेग साईडच्या दिशेने चेंडू टाकला. हा चेंडू इतका फिरला की, त्याचा ऑफ स्टंप उडवून गेला. या चेंडूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाची प्लेइंग-११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT