krunal pandya removed from lucknow super gaints vice captaincy nicholas pooran named as new vice captain ipl 2024  yandex
Sports

IPL 2024 पूर्वीच पंड्याचा पत्ता कट! संघाने या खेळाडूवर दिली मोठी जबाबदारी

Lucknow Super Giants Vice Captaincy: आयपीएल २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं असून स्पर्धेतील पहिला सामना येत्या २२ मार्चपासून रंगणार आहे.

Ankush Dhavre

Nicholas Pooran Named As Vice Captain Of Lucknow Super Giants:

आयपीएल २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं असून स्पर्धेतील पहिला सामना येत्या २२ मार्चपासून रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. दरम्यान ही स्पर्धा तोंडावर असताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने मोठी घोषणा केली आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) मोठी उलटापालथ पाहायला मिळाली आहे. आगामी हंगामासाठी त्यांनी नव्या उपकर्णधाराची घोषणा केली आहे. गेल्या हंगामात क्रृणाल पंड्या (Krunal Pandya) हा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा उपकर्णधार होता. मात्र आगामी हंगामासाठी ही जबाबदारी निकोसल पुरनकडे सोपवण्यात आली आहे.

लखनऊ सुपर जायंट्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन केएल राहुलचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये केएल राहुल निकोलस पुरनला (Nicholas Pooran) लखनऊ सुपर जायंट्स संघाची जर्सी देताना दिसून येत आहे. या जर्सीच्या मागच्या बाजुला त्याचं नाव लिहिलेलं असून नावाच्या पुढे VC असं लिहिलं आहे.

केएल राहुल दुखापतग्रस्त..

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल भारत -इंग्लंड कसोटी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे तो आयपीएल स्पर्धेत खेळणार की नाही हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. जर केएल राहुल काही सामने बाहेर राहिला तर त्याच्याऐवजी निकोलस पुरन संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. (Cricket news in marathi)

आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी असा आहे लखनऊ सुपर जायंट्सचा संघ:

केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, काइल मेयर्स, देवदत्त पडिककल, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, क्रुणाल पंड्या, युधवीर सिंग, यश ठाकूर,शामर जोसेफ, मोहसीन खान, , प्रेरक मंकड, अमित मिश्रा, मयंक यादव, कृष्णप्पा गौतम, अर्शीन कुलकर्णी, शिवम मावी, एम सिद्धार्थ, डेव्हिड विली, ॲश्टन टर्नर, मोहम्मद अर्शद खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT