नाशिकमधील मालेगाव महापालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलीय... मात्र यावेळी वादाचं कारण राजकीय नसून धार्मिक आहे...महानगरपालिकेच्या विद्युत विभागात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच वाद पेटला...
((व्हिडिओ लावा हिंदूत्ववादी)) भाजपसह हिंदूत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत विद्युत विभागाच्या कार्यालयाचं शुद्धीकरण केलं... इतकचं काय तर कार्यालयात हनुमान चालिसा पठण करण्यात आलं...((हनुमान चालिसा)) तसंच नमाज अदा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी केलीय..
खरतर प्रभागात क्रमांक चारमधील नागरिकांनी लाईट नसल्याची तक्रार देऊनही निवेदनाची दखल घेतली जात नव्हती...त्यामुळे लोकसंघर्ष समितीनं नागरिकांसह विद्युत विभागात ठिय्या मांडला... मात्र त्याचदरम्यान नमाज पठणाची वेळ झाल्यानं तिथेच नमाज पठण करण्यात आलं, असं लोकसंघर्ष समितीनं स्पष्ट केलं.
दरम्यान मालेगावच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असताना हा देश सर्वांचा आहे, अशी टीका आमदार अस्लम शेख यांनी केली.. तर नितेश राणेंनीही शेख यांना प्रत्युत्तर देत नमाज पठणासाठी मशिदी कमी पडल्या का? असा प्रश्न उपस्थित केलाय...
वीजेच्या साध्या तक्रारीतून सुरू झालेला हा विषय आता धार्मिक आणि राजकीय वळणावर येऊन ठेपला आहे. . मात्र यासगळ्यात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकडे मालेगाव महापालिका लक्ष देणार की धार्मिक धुव्रीकरणावरूनच राजकारण असचं सुरु राहणार?.... हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.