MI vs LSG Highlights: आकाशने लखनऊच्या नवाबांना दाखवलं 'आस्मान', एलिमिनेटर सामन्यात मुंबईचा तब्बल ८१ धावांनी विजय

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटनर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर तब्बल ८१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
MI vs LSG IPL 2023 Eliminator Match Result
MI vs LSG IPL 2023 Eliminator Match ResultSaam TV
Published On

MI vs LSG IPL 2023 Eliminator Match Result: वेगवान गोलंदाज आकाश मधवालचा भेदक मारा, त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली चांगली साथ आणि सांघिक खेळाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटनर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर तब्बल ८१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. (Latest sports updates)

आकाश मधवाल हा मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने ३.३ षटकात केवळ ५ धावा देत लखनऊच्या ५ फलंदाजांना माघारी पाठवलं. लखनऊविरुद्धच्या या विजयासह मुंबईने सेमीफायनलच्या फेरीत प्रवेश केला आहे. आता त्यांचा पुढचा सामना हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्ससोबत होणार आहे.

MI vs LSG IPL 2023 Eliminator Match Result
Ruturaj Gaikwad Catch: अद्भुत, अविश्वसनीय! तुफानी खेळीनंतर ऋतुराजचा मॅच विनिंग कॅच; VIDEO एकदा पाहाच

चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात  मुंबई इंडियन्सने  (Mumbai Indians) प्रथम फलंदाजी करताना लखनऊसमोर निर्धारित २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊची सुरूवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर प्रेरक मंकड केवळ ३ धावा करून बाद झाला. त्याला ह्रितिक शोकीनने बाद केलं.

त्यानंतर खतरनाक दिसणाऱ्या काइल मेयर्सला ख्रिस जॉर्डनने १८ धावांवर कॅमरून ग्रीनकरवी झेलबाद केले. सलग दोन विकेट्स लागोपाठ पडल्यानंतर कर्णधार क्रुणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस या दोघांनी लखनऊचा डाव सावरला होता. मात्र, पियुष चावलाने क्रुणाला पांड्याला बाद केलं. पांड्याला केवळ ८ धावाच करता आल्या. (Indian Premier League 2023)

त्यानंतर आकाश मधवालने एकाच षटकात लखनऊ सुपर जायंट्सला दोन धक्के दिले. आकाशने आधी आयुष बदोनी आणि निकोलस पूरनला बाद करत लखनऊच्या उरल्या सुरल्या आशेवरही पाणी फेरले. एका बाजूला विकेट्स पडत असताना, दुसऱ्या बाजूला स्टॉयनिसने लखनऊचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मोक्याच्या क्षणी स्टॉयनिस धावबाद झाला. त्याने २७ चेंडूत ४० धावा केल्या. स्टॉयनिस बाद झाल्यानंतर लखनऊचा (Cricket News) संघ पत्त्यासारखा कोसळला. त्यांना १६.३ षटकात केवळ १०१ धावाच करता आल्या. तत्पुर्वी मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना लखनऊसमोर विजयासाठी १८३ धावांचं लक्ष ठेवलं होतं.

मुंबईकडून कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा वगळता एकाही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. सूर्यकुमारने २० चेंडूत ३३ धावा (Sport News) तर ग्रीनने २३ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. शेवटच्या काही षटकात नेहाल वडेराने फटकेबाजी करत मुंबईला १८० धावांचा टप्पा पार करून दिला. वडेराने १२ चेंडूत २३ धावा कुटल्या. लखनऊकडून नवीन उल हकने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com