aditya shinde saam tv
क्रीडा

Aditya Shinde: कोकणचा आदित्य प्रो कबड्डी गाजवण्यासाठी सज्ज!आई-वडिलांच्या कष्टाचं केलं चीज

Ankush Dhavre

- अंकुश ढावरे

कोकणातील कोळकेवाडी हे गाव कोळकेवाडी डॅम आणि आपल्या अप्रतिम निसर्ग सौंदर्यासाठी ओळखलं जातं. मात्र, या गावाला जगाच्या नकाशात घेऊन जाण्यात आणि वेगळी ओळख मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली, ती शिंदे बंधूंनी.

अर्थात वाघजाई कोळकेवाडी क्रीडा मंडळाचे स्टार कबड्डीपट्टू शुभम शिंदे आणि आदित्य शिंदे यांनी. कोळकेवाडीतून मुंबईत येणं आणि मायानगरीत येऊन व्यावसायिक कबड्डी गाजवणं यासाठी शिंदे बंधूंनी लहानपणापासूनच प्रचंड मेहनत घेतली. अथक प्रयत्न, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शुभमने पटना पायरेट्स तर आदित्यने बंगाल वॉरियर्स संघात स्थान मिळवलंय.

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी व्हिडिओ पाहा.

आदित्य शिंदेने बंगाल वॉरियर्स संघाकडून खेळताना प्रो कबड्डीमध्ये पदार्पण केलं. या हंगामातही तो बंगाल वॉरियर्सकडून खेळताना दिसणार आहे. आदित्यच्या कबड्डी प्रवासाची सुरुवात वाघजाई कोळकेवाडी कबड्डी संघातून झाली.

वयाच्या १४-१५ व्या वर्षी त्याने कबड्डी खेळायला सुरुवात केली. आधी क्लब लेव्हल, मग राज्यस्तरीय, व्यायसायिक कबड्डी आणि आता चिपळूणचा हा स्टार बंगाल वॉरियर्सकडून मैदान गाजव्यासाठी मैदानात उतरणार आहे.

प्रवास मुळीच सोपा नव्हता...

यश हे एका रात्रीत मिळत नसतं. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आपला संघर्ष सांगताना आदित्य शिंदे म्हणतो.' भरपूर प्रेशर होतं, पण प्रेशर व्यवस्थित हँडल केलं की, सर्वकाही व्यवस्थित होतं. आम्हालाही स्ट्रगल करावा लागला. प्रत्येकजण सक्सेस पाहतो, पण आम्ही तेव्हा प्रोसेसमध्ये होतो. मी जेव्हा कबड्डी खेळायला सुरुवात केली, तेव्हा माहीत नव्हतं यात करियर होईल, नाही होईल. पण आम्ही मेहनत सोडली नव्हती.'

आई- वडिलांचा तो सल्ला

प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे, खेळाडूच्या मागे आई-वडिलांचा हात असतो. शिंदे बंधूंनाही यशस्वी बनवण्यात आई- वडिलांनी मोलाची भूमिका बजावली. याबाबत बोलताना आदित्य शिंदे म्हणतो, 'आमच्या कठीण काळात आम्हाला आई- वडिलांचा पाठिंबा होता. ते आम्हाला नेहमी म्हणायचे, तुम्ही खेळा. तुम्हाला जे काही लागेल ते आम्ही करु. आम्ही मेहनत घेणं सुरुच ठेवलं. कोरोना काळात सर्वच बंद होतं. त्यावेळी आमचंही नुकसान झालं होतं. तेव्हाही आई- वडिल पाठीशी होते. आम्ही मेहनत करणं सोडलं नाही, आम्ही प्रोसेसच्या मागे होतो. तुम्ही सक्सेसच्या मागे लागा, तुम्हाला कधीच सक्सेस मिळणार नाही. तुम्ही प्रोसेसच्या मागे लागा, स्ट्रगल करा, सक्सेस आपोआप मिळेल.

आदित्यच्या वडिलांनी त्याला एक सल्ला दिला होता, जो तो आजपर्यंत फॉलो करतोय. याबाबत बोलताना तो म्हणाला की, 'वडिलांनी हेच सांगितलं की, कधी हारायचं नाय. तुम्ही सामना गमावला, तरी चालेल. पण, स्वताहून हार मानयची नाही. तुमची कामगिरी चांगली नसेल, तुम्ही ती कामगिरी चांगली कशी करता येईल याचा विचार करा. प्रत्येक दिवशी तुम्ही स्वत:साठी १०० टक्के द्या. उद्या काय होईल, कोणालाच माहीत नाही. माझ्या वडिलांनी इतकच सांगितलं की, तुमच्यात काय कमी आहे हे ओळखा आणि त्यात सुधार करा.'

इथून कलाटणी मिळाली

आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट बद्दल सांगताना आदित्य म्हणाला, 'माझं कॉन्ट्रॅक्ट एअर इंडियामध्ये होतं. इथून सर्वांना समजलं की, कोणीतरी आदित्य आहे, जो डावा कोपरा सांभाळतो. तेव्हा मी एअर इंडियाचा कॅप्टन होतो. आम्ही दोघे भाऊ याच संघाकडून खेळायचो. तिथून सर्वांना आदित्य शिंदे कळला.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghaziabad Maid News: किळसवाण्या कृत्याची हद्द! मोलकरीण लघवी मिसळायची अन् जेवण बनवायची; अख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल

Chandgad Vidhan Sabha : थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले चंदगड निवडणुकीत तापणार; सहा पक्षांचा कस लागणार, कोण ठरणार वरचढ?

Nikki Tamboli: अरबाज अन् मी... रिलेशनशिपच्या नात्यावर निक्की काय म्हणाली? वाचा

Eknath Shinde : 'मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार'; एकनाथ शिंदेंची जरांगेंच्या भूमिकेवर मोठं विधान

Walking Exercise : चालला तो जगला; थांबला तो संपला, वाचा महत्वाचे फायदे!

SCROLL FOR NEXT