Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals x ipl
Sports

KKR vs RR: बटलरची 'रॉयल' खेळी; दोन विकेट राखत राजस्थानचा विजय

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : आज केकेआरच्या संघाने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची धुलाई करत २२३ धावा केल्या होत्या.

Bharat Jadhav

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : इडन गार्डनवर केकेआर आणि आरआरच्या संघात सामना झाला. या सामन्यात राजस्थानच्या संघातील जॉस बटलरने अशक्य ते शक्य करत कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत केलं. केकेआरने दिलेल्या २२३ धावांचे आव्हान बटलरच्या शतकी खेळीने २ विकेट राखत पार केलं.

या विजयासह राजस्थानने पॉइंट्स टेबलवरील आपलं स्थान कायम ठेवलंय. राजस्थान संघ ७ पैकी ६ सामने जिंकून पॉइंट्स टेबलवर अव्वल स्थानावर आहे. कोलकाता संघ ६ पैकी ४ सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानकडून जोस बटलरने ६० चेंडूत १०७ धावा केल्या. रियान परागने १४ चेंडूत ३४ धावा केल्या. रोव्हमन पॉवेलने १३ चेंडूत २६ धावा केल्या. कोलकाता गोलंदाजी करताना हर्षित राणाने ४५ धावांत २ बळी घेतले. सुनील नारायणने ३० धावांत २ बळी घेतले. वरुण चक्रवर्तीने ४ षटकात ३६ धावा देत २ बळी घेतले. वैभव अरोराने ४५ धावा देत एक बळी घेतला.

आजचा दिवस गोलंदाजांची धुलाई करणारा ठरला. दोन्ही संघातील फलंदाजांनी एकमेंकाच्या संघातील गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. पहिल्या डावात राजस्थानकडून गोलंदाजी करताना युजवेंद्र चहल सर्वात महाग गोलंदाज ठरला. चहलने ४ षटकं टाकली, यात त्याला १ विकेट मिळाली परंतु केकेआरच्या फलंदाजांनी त्यांच्याकडून तब्बल ५४ धावा कुटल्या. त्यानंतर आर अश्विनने ४ षटकं टाकली एकही विकेट न घेता त्याने केकेआरच्या फलंदाजांना ४९ धावा दिल्या. सर्वात कमी धावा बोल्टने दिल्यात, परंतु त्याला एकच विकेट मिळवता आली.

तर दुसऱ्या डावातही गोलंदाजांची स्थिती तशीच राहिली. पण यावेळी राजस्थानचे फलंदाज केकेआरच्या गोलंदाजांचा समाचार घेत होते. दरम्यान केकेआरचे गोलंदाज विकेट मिळवण्यात यशस्वी ठरले. केकेआरकडून गोलंदाजी करताना सर्वाधिक धावा मायकेल स्टार्कने दिल्यात एक विकेट घेत त्याने ५० धावा दिल्या. राजस्थानच्या फलंदाजांनी आंद्र रसेलची जबर धुलाई केली. त्याच्या एकाच षटकातून राजस्थानच्या खेळाडूंनी १७ धावा कुटल्या.

आज राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी घेत केकेआरला कमी धावात रोखू असा प्लान आखून मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या गोलंदाजांची केकेआरने जोरदार धुलाई केली होती. कोलकाताने २० षटकांत ६ गडी गमावत २२३ धावा केल्या होत्या. यात सुनील नारायणने १०९ धावांची तडाखेबाजी खेळी केली होती. अंगकृश रघुवंशीने १८ चेंडूत ३० धावा केल्या. रिंकू सिंगने ९ चेंडूत २० धावा केल्यानंतर नाबाद राहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

Maharashtra Live News Update: ST प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

Cancer prevention tips: 3 पैकी १ कॅन्सर टाळता येतो! लाईफस्टाईलमध्ये ५ बदल वाचवू शकतात तुमचा जीव; तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

SCROLL FOR NEXT