Panchang Today: ३० डिसेंबरला पुत्रदा एकादशीचा विशेष योग; कोणत्या राशींवर पडणार विष्णू कृपा? वाचा पंचांग

Putrada Ekadashi 2025 date: ३० डिसेंबर २०२५ रोजी पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी साजरी केली जाणार आहे. ही एकादशी वर्षातील शेवटची एकादशी असून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानली जाते.
Putrada Ekadashi 2025 date
Putrada Ekadashi 2025 datesaam tv
Published On

आज ३० डिसेंबर असून पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी, पुत्रदा एकादशी आणि मंगळवार या दिवशी येतो. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. अशावेळी संतती सुखाचे दार उघडणार आहेत. कोणत्या राशींसाठी हा दिवस शुभ किंवा अशुभ आहे ते जाणून घेऊया.

आजचं पंचांग

  • तिथि – शुक्ल दशमी

  • नक्षत्र – भरणी

  • करण – गर

  • पक्ष – शुक्ल पक्ष

  • योग – सिद्ध (रात्री ०१:०२:१५ पर्यंत, ३१ डिसेंबर)

  • दिवस – मंगळवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 07:04:09 AM

  • सूर्यास्त – 05:35:29 PM

  • चंद्र उदय – 01:34:10 PM

  • चंद्रास्त – 02:23:49 AM

  • चंद्र राशि – मेष

  • ऋतु – हेमंत

Putrada Ekadashi 2025 date
Parivartan Rajyog: राहू-शनीने तयार केला पॉवरफुल 'परिवर्तन राजयोग'; 'या' राशींना बिझनेसमध्ये होणार नफा

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह – अमान्ता – पौष

  • माह – पूर्णिमान्ता – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 02:57:39 PM ते 04:16:34 PM

यमघंट काल – 09:41:59 AM ते 11:00:54 AM

गुलिकाल – 12:19:49 PM ते 01:38:44 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:58:00 AM ते 12:40:00 PM

आजच्या चार शुभ राशी

मेष

आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वासात वाढ होणार आहे. यावेळी कामात पुढाकार घेण्याची संधी मिळू शकणार आहे. नवीन प्रकल्प किंवा जबाबदारी स्वीकारण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

सिंह

कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांचं कौतुक होणार आहे. वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात स्पष्टता राहणार आहे. नियोजनबद्ध काम केल्यास चांगले परिणाम दिसून येणार आहेत.

Putrada Ekadashi 2025 date
Shash Rajyog: शनीदेवामुळे तयार झाला शश राजयोग; 'या' राशींच्या नशीबाची दारं उघडणार, मिळणार दुप्पट लाभ

धनु

आजचा दिवस शिक्षण, प्रवास किंवा नवीन कल्पनांसाठी चांगला आहे. मन उत्साही राहील आणि आत्मविकासाकडे कल वाढणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी संवाद साधण्याची संधी मिळू शकणार आहे.

Putrada Ekadashi 2025 date
Auspicious Day Zodiac Signs: चंद्रदेवाच्या आशिर्वादाने आजचा दिवस ठरणार खास; या राशींना मिळणार शुभ परिणाम

मिथुन

बौद्धिक कामांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. लेखन, संवाद, चर्चा किंवा करार यामध्ये यश मिळू शकणार आहे. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल वेळ आहे.

Putrada Ekadashi 2025 date
Kendra Yog 2025: उद्यापासून या राशींच्या नशीबाची दारं उघडणार; न्याय देवता शनी बनवणार पॉवरफुल योग

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com