Manasvi Choudhary
कांदा पोहे सकाळचा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता आहे. कांदा पोहे तुम्ही विविध प्रकारे बनवू शकता.
हिवाळ्यात तुम्ही कांदा पोहे मध्ये मटार टाकल्यास चविष्ट लागतात.
मटार कांदा पोहा बनवण्यासाठी पोहे, कांदा, मटार, बटाटा, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ, लिंबू, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.
सर्वप्रथम पोहे चाळणीत घेऊन स्वच्छ धुवा. त्यातील पाणी काढून एका प्लेटमध्ये ठेवा.
गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाका. त्यानंतर शेंगदाणे टाकून ते कुरकुरीत होईपर्यंत तळा.
या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची परतून घ्या. कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यात मटार मिक्स करून संपूर्ण मिश्रण वाफवून घ्या.
मटार शिजल्यावर त्यात भिजवलेले पोहे टाका. सर्व मिश्रण नीट एकत्र करा. झाकण ठेवून मंद आचेवर वाफवून घ्या
अशाप्रकारे पोहे तयार झाल्यानंतर त्यावर वरून कोथिंबीर, ओले खोबरे आणि लिंबाचा रस पिळून गरमागरम सर्व्ह करा.