Manasvi Choudhary
घरी मंच्युरियन बनवताना ते कुरकुरीत होत नाही अश्या अनेकांच्या तक्रारी असतात.
कुरकुरीत मंच्युरियन बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच ही रेसिपी ट्राय करू शकता.
मंच्युरियनसाठी बारीक केलेला कोबी मीठ टाकल्यानंतर त्यातील पाणी पिळून काढा कोबीमध्ये पाणी असल्यास मंच्युरियन कुरकुरीत होणार नाही.
मिश्रणात केवळ मैदाच नाहीतर कॉर्नफ्लोर देखील वापरा यामुळे मंच्युरियन्स कुरकुरीत होतात.
मंच्युरियनचे पीठ मळताना वरून अजिबात पाणी टाकू नका. भाज्यांच्या ओलसरपणातच पीठ मळा.
सुरूवातील मंच्युरियन अर्धवट तळून बाहेर काढा. नंतर मंच्युरियन डबल फ्राय करा यामुळे ते कुरकुरीत होतील.