मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या मोसमात (IPL 2022) कोलकता नाईट रायडर्स संघ 'प्ले ऑफ'च्या दिशेनं आगेकूच करण्यासाठी अजूनही संघर्ष करत आहे. सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये केकेआरने (kolkata knight riders) विजय संपादन करुन धमक दाखवली होती. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये सतत होणाऱ्या पराभवामुळं केकेआरची प्ले ऑफमध्ये पोहचण्याची वाट अंत्यंत बिकट झाली आहे. यंदाच्या मोसमात केकेआरचे सलामीवीर फलंदाज (Ajinkya rahane) अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दोघांनाही प्लेईंग ११ मधून बाहेर काढण्यात आले. याच पार्श्वभूमीवर कोलकता संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रॅन्डन मॅकुलमने (Brendon Mccullum) प्रतिक्रिया देत व्यंकटेश अय्यरचं समर्थन केलं आहे.
अय्यरबद्दल बोलताना मॅकुलम म्हणाला, यंदाच्या आयपीएल हंगामात व्यंकटेश अय्यरला दमदार कामगिरी करता आली नाही.गेल्या सात-आठ महिन्यांपासून व्यंकटेशनं भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं.त्यामुळं व्यंकटेशसारखा खेळाडू प्लेईंग ११ मधून बाहेर पडणं, ही निराशाजनक बाब आहे. व्यंकटेशने गेल्या हंगामात अप्रतिम फलंदाजी करुन १० सामन्यांमध्ये ३७० धावा कुटल्या होत्या.गतवर्षीच्या हंगामात केकेआरला अंतिम फेरीत पोहचवण्यात व्यंकटेश अय्यरचा मोलाचा वाटा होता. दरम्यान, व्यंकटेशने गोलंदाजीतही भेदक कामगिरी केली नाहीय.१२ हून अधिकच्या इकोनॉमीने व्यंकटेशने तीन षटकं फेकली आहेत. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडीयममध्ये आज सोमवारी केकेआर आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना होणार आहे.त्यामुळे या सामन्यात व्यंकटेशला पुन्हा संधी दिली जाणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
असा आहे व्यंकटेश अय्यरचा फॉर्म ?
व्यंकटेश अय्यरने गेल्यावर्षी झालेल्या आयपीएलच्या हंगामात केकेआरसाठी अप्रतिम कामगिरी केली होती. त्यामुळे यंदाच्या आयपीएलच्या पर्वात लिलाव सुरु होण्यापूर्वीच व्यंकटेशची केकेआरने आपल्या संघात निवड केली. त्यानंतर व्यंकटेशने सलामीवीर फंलंदाज म्हणून सात सामन्यांमध्ये केकेआरसाठी फक्त १०९ धावाच केल्या. तसंच मिडल ऑर्डरमध्येही त्याला संधी मिळाल्यावर त्याने दमदार कामगिरी केली नाही. व्यंकटेशने मुंबई इंडियन्सच्या विरोधात अर्धशतकी खेळी केली होती. परंतु,त्यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याला फॉर्ममध्ये सातत्य न ठेवता आल्याने प्लेईंग ११ मधून बाहेर पडावं लागलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.