RINKU SINGH twitter
Sports

Rinku Singh: 'गॉड्स प्लान',55 लाख ते 13 कोटी; 2265.64 टक्के हाईक अन् रिंकूने खरेदी केलं स्वप्नातलं घर

Rinku Singh Buys House: कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज रिंकू सिंगने हक्काचं घर खरेदी केलं आहे.

Ankush Dhavre

Rinku Singh News In Marathi: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी सर्व १० संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आगामी हंगामासाठी ६ खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र आश्चर्यचकित करणारी बाब अशी की, गेल्या हंगामात चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरला संघाबाहेर करण्यात आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आगामी हंगामासाठी रिंकू सिंग, आंद्रे रसेल, हर्षित राणा, सुनील नरेन, रमनदीप सिंग आणि वरुण चक्रवर्तीला रिटेन केलं आहे. कोलकाताने रिंकू सिंगला १३ कोटी रुपये देऊन रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने रिंकू सिंगला ५५ लाख रुपये देऊन आपल्या संघात कायम ठेवलं होतं. मात्र आता २२६३.६४ टक्के हाईक देऊन कोलकाता नाईट रायडर्सने त्याला १३ कोटी रुपये दिले आहेत.

म्हणजे दिवाळीच्या दिवशी रिंकू सिंगची चांगलीच लॉटरी लागली. कोलकाताने रिंकूला इतर ५ खेळाडूंपेक्षा अधिक पैसे दिले आहेत. आयपीएलमध्ये रिटेन होण्यापूर्वी रिंकू सिंगने अलिगडमध्ये अलिशान घर खरेदी केलं आहे. रिंकू सिंग आपल्या कुटुंबासह एका छोट्याशा खोलीत राहायचा. मात्र आता त्याने हक्काचं घर खरेदी केलं आहे.

अशी राहिली कारकीर्द

रिंकू सिंग हा कोलकाता नाईट रायडर्स संघातील प्रमुख फलंदाज आहे. कोलकाताने यावेळी त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. त्याला २०१८ मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तेव्हापासून तो याच संघाकडून खेळतोय.

तेव्हापासून तो आतापर्यंत त्याला आयपीएल स्पर्धेत ४६ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १४३ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना ८९३ धावा केल्या आहेत. चौकार षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रिंकूने ६७ चौकार आणि ४६ षटकार खेचले आहेत.

कोलकाताने या खेळाडूंना केलं रिटेन

रिंकू सिंह (१३ कोटी), वरुण चक्रवर्ती (१२ कोटी), सुनील नरेन (१२ कोटी), आंद्रे रसेल (१२ कोटी), हर्षित राणा (४ कोटी), रमनदीप सिंह (४ कोटी)

या खेळाडूंना केलं रिलीज 

श्रेयस अय्यर, नितीश राणा, अनुकूल रॉय, व्यंकटेश अय्यर, वैभव अरोरा, केएस भरत , चेतन सकारिया,रहमानुल्लाह गुरबाज, फिल सॉल्ट, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रुदरफोर्ड, मनीष पांडे, अल्लाह गजनफर, दुशमंथा चमीरा, साकिब हुसेन, जेसन रॉय, गस एटकिंसन, मुजीब उर रहमान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT