Rinku Singh Tattoo: रिंकू सिंगच्या नव्या टॅटूची जोरदार चर्चा; पण 'Gods Plan'चा नेमका अर्थ काय? VIDEO

Rinku Singh Tattoo News In Marathi: रिंकू सिंगने आपल्या हातावर नवा टॅटू काढला आहे. या टॅटूचा अर्थ काय? जाणून घ्या.
Rinku Singh Tattoo: रिंकू सिंगच्या नव्या टॅटूची जोरदार चर्चा; पण 'Gods Plan'चा नेमका अर्थ काय? VIDEO
rinku singhtwitter
Published On

Rinku Singh News In Marathi: भारतीय संघातील आक्रमक फलंदाज रिंकू सिंग बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत अॅक्शनमध्ये दिसणार आहे. या मालिकेपूर्वी तो कसून सराव करतोय. आयपीएलमध्ये सलग ५ षटकार खेचून एका रात्रीत स्टार झालेला रिंकू सिंग नेहमीच चर्चेत असतो.

मात्र यावेळी तो आपल्या फलंदाजीमुळे नव्हे, तर आपल्या टॅटूमुळे चर्चेत आला आहे. रिंकूने आपल्या हातावर 'gods plan' असा टॅटू बनवला आहे. आता बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने या टॅटूचा अर्थ काय? हे सांगितलंय.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये रिंकू सिंग म्हणतोय, ' सर्वांना माहित आहे की, मी gods plan असं म्हणतो. हे खूप प्रसिद्ध आहे. जे मी बोलतो, ते मी टॅटू म्हणून गोंदवून घेतलं. लोकं मला याच नावाने ओळखतात. मात्र या टॅटूची खासियत म्हणजे, मी खेचलेले ५ षटकार. मी ज्या दिशेने ५ षटकार खेचले होते, ते मी या टॅटूमध्ये दाखवलं आहे. २ षटकार कव्हरच्या दिशेने आणि २ सरळ खेचले होते. तर १ षटकार पायाच्या जवळून खेचला होता. इथून माझं आयुष्य बदललं.'

Rinku Singh Tattoo: रिंकू सिंगच्या नव्या टॅटूची जोरदार चर्चा; पण 'Gods Plan'चा नेमका अर्थ काय? VIDEO
IND vs BAN: मयांकसह या खेळाडूंना मिळणार पदार्पणाची संधी; सूर्यकुमार यादव कोणाला बसवणार?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिंकूचा जलवा

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर रिंकू सिंगला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तो ऑगस्ट २०२३ मध्ये आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. तेव्हापासून तो भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका बजावतोय. त्याला आतापर्यंत २३ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ४१८ धावा केल्या आहेत. तसेच २ वनडे सामन्यांमध्ये त्याने ५५ धावा केल्या आहेत.

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेत रिंकू सिंग खेळताना दिसणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ग्वालियरच्या मैदानावर रंगणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना १२ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com