swapnil kusale saam tv news
Sports

Asian Games 2023: कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा! स्वप्निल कुसाळेला सुवर्णपदक

Swapnil Kusale News: कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

>>रणजित माजगावकर

Asian Games 2023:

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांची चमकदार कामगिरी सुरू आहे. भारताने आतापर्यंत एकुण ३४ पदकं पटकावली आहेत. यापैकी १९ पदकं ही नेमबाजांनी जिंकून दिली आहेत.

पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये भारताने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात स्वप्निल कुसाळेसह ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, अखिलेशवरण यांनी मोलाची भुमिका बजावली आहे.

कोल्हापूरकर स्वप्निल कुसाळेने ५९१, ऐश्वर्या प्रताप सिंग तोमरने ५९१ आणि अखिलेशवरण ५८७ गुणांची कमाई केली. एकुण १७६९ गुणांची कमाई करत अंतिम फेरीत चीनला धुळ चारली. या सांघीक यशानंतर कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. तसेच घवघवीत यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

स्वप्निल ने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदके पटकावत दर्जेदार कामगिरी केली असून पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठीही तो पात्र ठरला आहे. आता ऑलिंपिक स्पर्धेतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. (Latest sports updates)

स्वप्निल कुसाळेने भोसला मिलिटरी स्कुलमधून नेमबाजीचे धडे गिरवले. त्याने ५९ व्या आणि ६१ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०१५ मध्ये कुवेत येथे उपकनिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेतील थ्री प्रेान प्रकारात त्याने जेतेपदाला गवसणी घातली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

Maharashtra Tourism: लोणावळा, माथेरान विसराल; महाराष्ट्रातील 'हे' स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, कधी पाहिलंत का?

Maratha Reservation: आता मुंबईला जाणारे दूध,भाजीपाला बंद करू; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा

SCROLL FOR NEXT