hardik pandya suryakumar yadav twitter
Sports

Team India Captain: सूर्यकुमार यादवला मिळणार गंभीरची साथ? हार्दिक पंड्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत पिछाडीवर का? वाचा कारणं

Team India T20I Captain: रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. दरम्यान या शर्यतीत हार्दिक पंड्या पिछाडीवर का आहे?

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या मालिकेसाठी युवा खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. या संघाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली होती. भारतीय संघ लवकरच वनडे आणि टी-२० मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होता. तर हार्दिक पंड्याकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्याचं नाव आघाडीवर होतं. मात्र आता हार्दिकऐवजी सूर्यकुमार यादवच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.

भारतीय संघ २७ जुलैपासून टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या खेळताना दिसून येणार आहे. मात्र त्याला कर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकरांना सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून हवा आहे. गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी हार्दिक पंड्यासोबत याबबत चर्चाही केली आहे.

काय आहेत कारणं?

हार्दिक पंड्याची फिटनेस हा सर्वात मोठा अडथळा आहे. कारण आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेवेळी हार्दिक पंड्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यानंतर तो संघात कमबॅक करु शकला नव्हता. एक खेळाडू हार्दिक पंड्या बेस्ट आहे. मात्र त्याची नेतृत्वाची स्टाईल कोणालाच आवडत नाही. हार्दिक पंड्याला आयपीएल २०२४ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाची जबाबदारी दिली गेली होती. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

SCROLL FOR NEXT