kl Rahul
kl Rahul saam tv
क्रीडा | IPL

KL Rahul Replacement: LSG संघाची ताकद तिपटीने वाढणार! KL Rahul च्या जागी ट्रिपल सेंच्युरी मारणाऱ्या फलंदाजाला संधी

Ankush Dhavre

KL Rahul Replacement For IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आता प्रत्येक सामना हा महत्वाचा सामना असणार आहे. कारण आता सर्वांचं लक्ष प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यावर असणार आहे.

आता महत्वाच्या क्षणी लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. दरम्यान आता त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे.

या फलंदाजाला मिळाली संधी...

केएल राहुल बाहेर होताच ५ मे रोजी त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. लखनऊने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी केएल राहुलच्या जागी तिहेरी शतक झळकावणाऱ्या करुण नायरला संधी दिली आहे.

करुण नायरला ५० लाख रुपये खर्च करत त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे. तसेच त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ७६ सामन्यांमध्ये १४९६ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

करुण नायरने झळकावले आहे तिहेरी शतक..

करुण नायरने भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेट खेळताना तिहेरी शतक झळकावले आहे. २०१६ मध्ये त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना ३०३ धावांची खेळी केली होती. या खेळी नंतर तो चर्चेत आला होता. ही खेळी त्याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केली होती. तो वीरेंद्र सेहवागनंतर कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला होता.

केएल राहूल बाहेर..

भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण दुखापतग्रस्त असलेला केएल राहुल आयपीएल सह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: मतांसाठी मराठी आणि गुजरातीचा वाद निर्माण केला; मनसेची ठाकरे गटावर टीका

Maharashatra Election: निवडणूक तोंडावर,ठाकरेंचा शिलेदार तडीपार; सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस

Maharashtra Election: महायुतीत दादाविरुद्ध दादा संघर्ष कायम; चंद्रकांत पाटलांकडून पवारांना संपवण्याची भाषा

Maharashtra Politics 2024 : कोल्हापूरच्या विजयासाठी लाखांच्या पैजा; वाढलेल्या टक्क्यानं वाढवली उत्सुकता

PBKS vs RCB: 'विराट' वादळानं RCB चा विजयी चौकार; पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; या संघांचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT