kl rahul took diving catch to dismiss ajinkya rahane video viral amd2000
kl rahul took diving catch to dismiss ajinkya rahane video viral amd2000 twitter
क्रीडा | IPL

KL Rahul Catch: सुपरमॅन केएल राहुल! डाईव्ह मारत टिपला रहाणेचा भन्नाट झेल- Video

Ankush Dhavre

आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टार फलंदाज केएल राहुल फॉर्ममध्ये परतला आहे. लखनऊ सुपरजायंट्स संघाकडून खेळताना त्याने फलंदाजीत आणि यष्टीरक्षणातही चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. येत्या १ जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी केएल राहुलने दावा केला आहे.

केएल राहुलचा शानदार झेल...

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात केएल राहुलने शानदार झेल टिपला आहे. तर झाले असे की, लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून मॅट हेनरी गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी अजिंक्य रहाणे स्ट्राईकवर आला होता.

मॅट हेनरीने टाकलेला चेंडू टप्पा पडून बाहेर निघाला. या चेंडूवर रहाणेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची कडा घेत यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातात गेला. त्याने उजव्या बाजूला डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला. त्याचा हा झेल पाहून कोणालाच विश्वास बसत नव्हता.

भारतीय संघात स्थान मिळणार का?

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी केएल राहुलला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेतही त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवणं मुळीच सोपं नसणार आहे.

कारण यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवण्यासाठी इशान किशन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन आणि जितेश शर्मा हे खेळाडू देखील शर्यतीत आहे. हे खेळाडू देखील तुफान फॉर्ममध्ये आहेत. यष्टीरक्षक फलंदाजासह त्याला केवळ फलंदाज म्हणूनही संघात स्थान दिले जाऊ शकते. निवकडकर्ते कोणाला स्थान देणार हे पाहणं आता महत्वातं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT