Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संतापले

Mumbai Mulund Political News: मुंबईत अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाचा प्रचार थेट हातघाईवर पोहचलाय. मुलुंडमध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये पैसे वाटण्यावरून झालेल्या राड्यामुळे उद्धव ठाकरेंनी कमालीचा आक्रमक पवित्रा घेतलाय.
'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संतापले
Uddhav Thackeray on Mulund Shiv Sena BJP Clash Saam tv

Uddhav Thackeray on Mulund Shiv Sena - BJP Clash:

तन्मय टिल्लू,  साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबईत अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाचा प्रचार थेट हातघाईवर पोहचलाय. मुलुंडमध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये पैसे वाटण्यावरून झालेल्या राड्यामुळे उद्धव ठाकरेंनी कमालीचा आक्रमक पवित्रा घेतलाय. विक्रोळीत केलेल्या भाषणात त्यांनी पोलिसांना जाहीर सभेत दम दिलाय. शिवसैनिकांवर कारवाई केलेल्या पोलिसांना सत्ता आल्यानंतर बघून घेण्याची भाषा वापरलीय. उद्धव ठाकरेंनी पोलिसांना दम भरताना फडणवीसांचीही खिल्ली उडवलीय.

शुक्रवारी मुलुंडमध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. भाजपकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संतापले
Manoj Jarange Patil: उपोषणावर ठाम, निवडणुकीत फोडणार घाम; जरांगे उतरणार विधानसभेच्या मैदानात

त्याचबरोबर ठाकरे गटाच्या 5 कार्यकर्त्यांना अटक देखील केली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे संतापले आहेत. तर दुसरीकडे भाजपला कमी मतदान होण्याची भीती असलेल्या ठिकाणी ते मतदानाच्या आधीच मतदारांच्या बोटाला शाई लावत असल्याचा धक्कादायक आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. मात्र त्यांचा आरोप महायुतीनं खोडून काढलाय.

राज्यात मतदानापूर्वी पैसे वाटण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या. आता हे लोण मुंबईतही पसरलंय. एवढंच नव्हे तर यावरून राडेही सुरू झाले आहेत.

'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संतापले
Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

पैशांसोबतच आता शाईचा नवा मामला सुरू झाल्यामुळे मुंबईत मतदानापूर्वी राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी पोलिसांवर आगपाखड केल्यामुळे हा कलगितुरा विधानसभा निवडणुकीपर्यंत रंगण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com