kl rahul twitter
क्रीडा

KL Rahul ने स्वाभिमान जपला! 18 कोटींना लाथ मारत लखनऊची साथ सोडली; 4 संघांकडून मोठी ऑफर

Lucknow Super Giants, KL Rahul: स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने लखनऊ सुपर जायंट्स संघाची साथ सोडली आहे.

Ankush Dhavre

KL Rahul News In Marathi: आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावापूर्वी केएल राहुलबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून, लखनऊ सुपर जायंट्सचा संघ केएल राहुलला रिटेन करणार नसल्याची चर्चा सुरु होती. मात्र माध्यमातील वृत्तानुसार, केएल राहुलने स्वत:हुन या संघाकडून खेळण्यास नकार दिला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला मोठी रक्कम देऊन रिटेन करण्याचा प्लान केला होता. मात्र त्याने ऑफर फेटाळून लावली आहे.

राहुलने नाकारली ऑफर

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, केएल राहुलने आगामी हंगामात लखनऊ सुपर जांयट्स संघाकडून खेळण्यास नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा सुरु होती की, राहुलची स्लो फलंदाजी पाहून लखनऊचा संघ त्याला रिलीझ करणार आहे. आता लेटेस्ट अपडेटनुसार, लखनऊचा संघ त्याला १८ कोटी रुपये देणार होता. मात्र राहुलने वैयक्तिक आणि प्रोफेशनल कारणामुळे लखनऊ सुपर जायंट्स संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या संघांकडून मोठी ऑफर

माध्यमातील वृत्तानुसार, केएल राहुलने लखनऊ सुपर जायंट्स संघाची साथ सोडण्याची पूर्ण प्लानिंग केली आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून मोठी ऑफर आहे. यापूर्वी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यावेळी त्याने दमदार कामगिरी केली होती. यासह चेन्नई सुपर किंग्ज संघानेही त्याला आपल्या संघात घेण्यात रस दाखवला आहे. या दोन्ही संघांसह राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सचा संघ देखील त्याला आपल्या संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकतो.

संघमालकांसोबत झाला होता वाद

गेल्या हंगामात केएल राहुल हा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार होता. या हंगामातील शेवटच्या सामन्यात केएल राहुल आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, केएल राहुल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT