तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचं पारडं जड दिसत आहे. तुळजापूरचे संभाव्य आमदार कोण असतील अशी चर्चा असतानाच, एक्झिट पोलमधून भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील हे संभाव्य आमदार असू शकतात. या मतदारसंघात त्यांच्याविरोधात काँग्रेसचे कुलदीप कदम पाटील उर्फ धीरज पाटील हे आहेत.
महाविकास आघाडीकडून धीरज पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील हे सलग दुसऱ्यांना निवडणूक रणांगणात उतरले आहेत. राणा जगजितसिंह पाटील हे विकासकामे घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरले. लाडकी बहीण योजना गावोगावी पोहचवण्यात ते यशस्वी झाले. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीचा घोळ पाहायला मिळाला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांना डावलून धीरज पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळं चव्हाण नाराज असल्याचे पाहायला मिळाले. धीरज पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनीही कामे केली आहेत. पण मधुकरराव चव्हाण सक्रिय नसल्याने याचा फटका धीरज पाटील यांना बसल्याचे पाहायला मिळते.
समाजवादी पक्षाकडून देखील देवानंद रोचकरी मैदानात होते. मविआकडून पुरस्कृत उमेदवार असल्याचे ते सांगत होते. या गोष्टीचा फटका काही प्रमाणात धीरज पाटलांना बसू शकतो, असे बोलले जाते. वंचितने देखील मतदारसंघात फिल्डिंग लावल्याचे सांगण्यात येत आहे. याचा फटका धीरज पाटील यांना बसू शकतो आणि भाजपचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांना फायदा होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.