Athiya Shetty and KL Rahul Image Saam Tv
Sports

चर्चा तर होणारच! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर केएल राहुलसाठी आथिया शेट्टीनं पोस्ट केली शेअर

गेल्या अनेक दिवसापासून क्रिकेटर केएल राहूल आणि सुनिल शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी यांच्या दोघांच्याही प्रेमाची चर्चा रंगत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेल्या अनेक दिवसापासून क्रिकेटवीर केएल राहूल (KL Rahul) आणि सुनिल शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी आथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या दोघांच्याही प्रेमाची चर्चा रंगत आहे. दोघेही एकत्र अनेक दिवसापासून वेळ घालवताना दिसत आहे. सध्या आथिया आणि राहुल एकमेकांना भेटत नाहीत कारण राहुलने मोहालीतील पीसीए स्टेडियमवर (PCA Stadium) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 दरम्यान अर्धशतक पूर्ण केले होते. अथिया तिचा प्रियकर आणि टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलच्या या कामगिरीवर खूप खूश झाली असून आथियाने त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

केएल राहुलने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अथिया शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये केएल राहुल बॅट घेऊन जाताना दिसत आहे. त्याचा हा फोटो शेअर करताना त्याने हार्ट इमोजी शेअर केला आहे. या सामन्यात राहुलने केवळ 35 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. केएल राहुलनेही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीत तीन मोठे षटकार ठोकले. मॅचमधील 12व्या ओवरमध्ये केएल राहुलला जोश हेझलवूडने बाद केले. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत आथिया अनेकदा राहूलसोबत एकत्र दिसली आहे. अथिया ही बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. या प्रेमीयुगलांनी एकमेकांवर प्रेम करत असल्याची कबूलीही दिली होती. राहुलने आपल्या वाढदिवसादिवशी आथियासोबत एका आकर्षक पोस्टकरत आपल्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

Athiya Shetty

अथिया शेट्टी आणि केएल राहुल डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून माध्यमांवर बातम्या दिसत होत्या. दरम्यान, दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची बातमीही आली आहे. मात्र, नंतर या बातम्या निव्वळ अफवा ठरल्या. पण आता दोघेही आपले प्रेम उघडपणे व्यक्त करत असल्याने लवकरच दोघेही लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांचेही फोटो चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे. अनेकदा दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT