KL Rahul, Yashasvi Jaiswal or Nitish Reddy 
Sports

IND vs WI : नितीश रेड्डी, केएल की यशस्वी.. कुणाचा झेल सर्वोत्कृष्ट? तिन्ही व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा

KL Rahul vs Yashasvi vs Nitish best catch debate : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीत केएल राहुल, नितीश रेड्डी आणि यशस्वी जायसवाल यांनी अप्रतिम झेल घेतले. या तिन्ही झेलपैकी सर्वोत्तम झेल कोणता? सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

Namdeo Kumbhar

KL Rahul, Yashasvi Jaiswal or Nitish Reddy – Which Catch Was the Best? : वेस्ट इंडिजविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. फलंदाजी, गोलंदाजीसोबत फिल्डिंगमध्येही भारतायी खेळाडूंनी वर्चस्व मिळावलेय. भारतीय भेदक माऱ्यासमोर विंडिजची फलंदाजी ढेपाळली. त्यात भारताच्या क्षेत्ररक्षकांनी भर टाकत अडचणी वाढल्या. केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी अन् यशस्वी जायस्वाल यांनी अप्रतिम झेल घेत विडिंजच्या महत्त्वाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडली. या तिघांच्या झेलची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. कुणाचा झेल सर्वोत्कृष्ट याबाबत चाहत्यांमध्ये मदभेद दिसून येत आहेत. तिघांच्या झेलचे व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा.. कुणाचा झेल सर्वोत्कृष्ट...

केएल राहुलचा स्लिपमध्ये अफलातून झेल -

रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर केएल राहुलने अफलातून झेल घेत ब्रेंडन किंग याचा डाव संपुष्टात आणला. किंग हा विडिंजच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज मानला जातोय. रवींद्र जाडेजाने पहिल्या स्लीपमध्ये झेल घधेत किंगचा डाव अवघ्या ५ धावांवर संपुष्टात आणला. पाहा राहुलचा झेल...

यशस्वीचा भन्नाट झेल -

रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर यशस्वी जायस्वालने भन्नाट झेल घेत विस्टइंडिजची 'होप' संपुष्टात आणली. जाडेजाने टाकलेल्या चेंडूवर शाय होपने जोरात फटका मारला. पण यशस्वी जायस्वाल यानं हवेत पुढे झेपवत भन्नाट झेल घेत वेस्ट इंडिजला पाचवा धक्का दिला. शाय होप याला फक्त एक धाव काढता आली.

पाहा व्हिडिओ

नितीशने घेतला आयुष्यातील सर्वोत्तम झेल

मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर अष्टपैलू नीतीश कुमारने आपल्या करिअरमधील सर्वोत्तम झेल घेतला. तेगनारायण चंद्रपॉल याने सिरजाच्या चेंडूवर जोरात फटका मारला. नीतीश कुमार याने हवेत उडी मारत झेल घेत सर्वांनाच धक्का दिला. रेड्डीचा झेल पाहून मोहम्मद सिराजलाही विश्वास बसला नाही. रेड्डीच्या झेलची सोशल मीडिायवर जोरदार चर्चा सुरू आहे. विडिंजसाठी सर्वात विश्वासू असणाऱ्या चंद्रपॉल याला स्वस्तात माघारी परतावे लागले.

पाहा व्हिडिओ

भारताचा विडिंजवर मोठा विजय -

शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात विडिंजचा एख डाव आणि १४० धावांनी दारूण पराभव केला. रवींद्र जाडजे, मोहम्मद सिराज, ध्रुव जुरेल, केएल राहुल यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने विजय मिळवला आहे. भारताकडे रवींद्र जाडेजाने फलंदाजीत शतक झळकावले. त्याशिवाय दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ४ विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने दोन्ही डावात मिळून ७ विकेट घेतल्या.

वेस्ट इंडिचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांत संपुष्टात आला. प्रत्युत्तर दाखल भारताने पहिल्या डावात ५ बाद ४४८ धावांचा डोंगर उभारला. वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी १४६ धावात गुंडाळत मोठा विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Side Effects: जास्त प्रमाणात पनीर खाल्ल्याने फायद्याऐवजी होतं नुकसान? पण कसं?

MSRTC News: ‘आपली एसटी’ कुठंय? आता प्रवाशांना मिळणार MSRTC बसेसचं रिअल-टाइम अपडेट्स

IND Vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी-२० सीरीजसाठी हार्दिकला वगळलं, नेमकं कारण काय?

GK : भारतामधील सर्वात जास्त शिकलेले राज्य कोणते आहे? जाणून घ्या

Shocking : एकाच तरुणीला दोघांनी ब्लॅकमेल करून केला बलात्कार, शिक्षकाच्या काळ्या कृत्यामुळे परभणी हादरली

SCROLL FOR NEXT