Prakash Ambedkar speech at Akola Dhamma event 2025
Prakash Ambedkar on PM ModiSaam TV Marathi News

मोदी विश्वगुरू नव्हे तर चपराशी, आंबेडकरांची जहरी टीका, नेमकं काय म्हणाले ?

Prakash Ambedkar speech at Akola Dhamma event 2025 : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर जोरदार टीका केली. "मोदी विश्वगुरू नव्हे तर चपराशी" असा घणाघात करत जागतिक पातळीवर मोदींना किंमत नसल्याचा आरोप केला.
Published on

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Prakash Ambedkar ON PM Modi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनाला कधी गेले का नाहीत?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. ते अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होतेय. गेल्या 42 वर्षांपासून अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होतो.‌ गेल्या 42 वर्षांपासून प्रकाश आंबेडकर हे या मेळाव्याला संबोधित करत आहेत. महिन्यातून एकदा अकोल्याला येणाऱ्या मोहन भागवतांनी अकोल्यापासून 35 किलोमीटरवरील शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन का घेतलं नाहीय?, असा सवाल त्यांनी केलाय. गजानन महाराज सर्वसामान्य ओबीसींचं श्रद्धास्थान असल्याने मोहन भागवतांनी असं केलं, असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय.

या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकरांनी भाजप, मोदी, संघ आणि मोहन भागवतांवर जोरदार टीका केलीये. भाजप आणि संघ हेच ओबीसींचा घात करतायेत. हे जेव्हा ओबीसींना समजेल तेव्हा त्यांचा आरक्षण वाचणार असल्याचं आंबेडकर म्हटलं आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात मोदींवर टीका जहरी टीका केलीय. मोदी विश्व गुरू नव्हे तर चपराशी असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. त्यांनी जगभरात मोदींना कोणतीच किंमत नसल्याचं म्हटलंय. जागतिक व्यासपीठावर म्हणूनच मोदींना चांगली वागणूक मिळत नसल्याची टीका त्यांनी केलीये. ट्रम्प हे मोदींना विश्वगुरू नव्हे तर चपराशी समजत असल्यामुळे त्यांनी अमेरिकेतून भारतीयांना हकलण्याचं धोरण स्वीकारल्याचं आंबेडकर म्हणालेत.

Prakash Ambedkar speech at Akola Dhamma event 2025
Cyclone Shakti : पूराने होरपळलेल्या महाराष्ट्रावर नवं संकट, IMD कडून चक्रीवादळाचा इशारा, अतिवृष्टी होणार

मोदींना जागतिक पातळीवर किंमत नसल्याने जगातील बहुसंख्य देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहत असल्याचा घणघात त्यांनी केलाय. शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालं, तर सरकार दिवाळीला मदत जाही केली. मात्र, शेतकऱ्यांना दिवाळीला सरकारी मदत मिळणार नाही याची खात्री असल्याचे आंबेडकर म्हटले. भाजप आणि संघाच्या कार्यपद्धतीत मदत हा शब्द नाही. भाजप आणि संघ ओबीसींचा घात करतायेत हे जेंव्हा त्यांना समजेल तेंव्हाच आरक्षण वाचेल. मोहन भागवत कधी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात गेले का? ते महिन्यातून एकदा अकोल्यात येतात. मग 35 किलोमीटरवरील शेगावला ते का जात नाहीत?. गजानन महाराज ओबीसींचं श्रद्धास्थान आहे. आपण बोलल्यानंतर ते आठवडाभरात लाजेखातर जातील. विश्वगुरू जेंव्हा जागतिक व्यासपीठावर जातो तेंव्हा त्याला जागतिक नेते कसे बाजूला सारतात याचे अनेक व्हिडीओ आहेत. जगातील अनेक देश पाकिस्तानच्या बाजूने आहेत, विश्वगुरू आहेस की चपराशी हे तुम्हाला दाखवतो. म्हणूनच ट्रंपने भारतीयांची हकालपट्टी सुरू केली. विश्वगुरू संकटात भर घालतोय, असे आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar speech at Akola Dhamma event 2025
Mumbai Local : धक्कादायक! लोकलमध्ये धक्काबुक्की, दारात उभ्या असणाऱ्या जवानाचा मृत्यू, मुंबई हादरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com