virat kohli and kl rahul  yandex
Sports

IND vs ENG 2nd Test: विराट-राहुल संपूर्ण मालिकेतून बाहेर होणार? वाचा लेटेस्ट अपडेट्स

KL Rahul And Mohammed Shami Injury Update: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर सुरु आहे. दरम्यान विराट आणि राहुलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli -KL Rahul Comeback News:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने दमदार खेळ करत भारतीय संघावर २८ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे दुसरा सामना जिंकून भारतीय संघ दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

शमी होणार बाहेर..

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार खेळ केला होता. या स्पर्धेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. त्यानंतर दुखपतीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तो इंग्लंडला गेला होता.

त्यामुळे त्याला सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यातून बाहेर ठेवण्यात आलं होतं. पुढील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान या सामन्यांमधूनही तो बाहेर होऊ शकतो. (Cricket news in marathi)

केएल राहुल बाहेर..

केएल राहुलने (KL Rahul) हैदराबाद कसोटीत भारतीय संघासाठी ८७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. मात्र दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या कसोटीतून बाहेर राहावं लागलं आहे. २०२२ मध्ये दुखापतीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याने कमबॅक केलं होतं. आता सध्या तो नॅशनल क्रिकेट ॲकेडमीत रिहॅब करतोय. त्याच्या खेळण्याबाबतही कुठलीही अपडेट समोर आलेली नाही.

विराट खेळणार का?

भारतीय संघाला बसलेला सर्वात मोठा धक्का म्हणजे विराट कोहलीने (Virat Kohli) सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यातून माघार घेतली. त्याने वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं. मात्र तो पुढील सामन्यांमध्ये कमबॅक करेल का याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. विराटची रिप्लेसमेंट म्हणून रजत पाटीदारला संघात स्थान दिलं गेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Gondia Travel: मुंबईवरून गोंदियाला प्रवास करणार आहात? जाणून घ्या रेल्वे, बस आणि विमानाचे सर्व पर्याय

IND vs AUS: काय ही फालतूगिरी? वारंवार पावसाचा व्यत्यय, फक्त ३२-३२ ओव्हर्सचा सामना, काय आहे नियम?

Maharashtra Live News Update : पुढचा कार्यक्रम ३ वाजता समजेल- राज ठाकरे

Musician Passes Away: जगप्रसिद्ध संगीतकाराचे निधन; वयाच्या ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

Jui Gadkari Photos: "तुला पाहता आजही, हासते या मनी चांदणे" जुई गडकरीचं फोटोशूट चर्चेत

SCROLL FOR NEXT