Virat Kohli and Dhoni gave an expensive gift to newly married couple SAAM TV
Sports

KL Rahul-Athiya Marriage: काय सांगता? विराट आणि धोनीने केएल राहुलला दिले एवढे महाग गिफ्ट!

KL Rahul-Athiya Marriage: टीम इंडीयाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली के एल राहुल आणि आथिया शेट्टीच्या लग्नाला उपस्थित राहु शकला नाही. मात्र त्याने नवविवाहित जोडप्याला खास गिफ्ट पाठवले आहे.

Chandrakant Jagtap

KL Rahul-Athiya Marriage: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज के एल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. खंडाळा येथील शेट्टी फॅमिलीच्या बंगल्यावर हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह समारंभाला बॉलिवूड आणि क्रिकेट (cricket) विश्वातील अनेक पाहुण्यांची उपस्थिती होती.

टीम इंडीयाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा या लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी के एल राहुल (KL Rahul) आणि आथिया यांना एक खास गिफ्ट दिले आहे.

भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळत आहे. या मालिकेत सहभागी असलेले अनेक खेळाडू के एल राहुलच्या विवाहास उपस्थित राहू शकले नाहीत. विराट कोहली देखील याच मालिकेत व्यस्त आहे. यामुळेच तो राहुलच्या विवाहाला उपस्थित राहिला नाही. परंतु त्याने या नवा दाम्पत्याला खास गिफ्ट दिले आहे आणि ते के एल राहुलला मिळाले देखील आहे.

विराटने गिफ्ट केली महागडी कार

विराट कोहलीने केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांना विवाहाच्या शुभेच्छा दिला आहेत. मीडिया रिपोर्टनुसार विराटने या जोडप्याला बीएमडब्ल्यू कंपनीची एक खास कार गिफ्ट केली आहे. या कारवर फिल्म आणि क्रिकेटशी संबंधित ग्राफिक्स आहेत आणि या कारची किंमत सुमारे २.१७ कोटी रुपये आहे.

धोनीनेही दिले खास गिफ्ट

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने देखील केएल राहुलला खास गिफ्ट दिले आहे. धोनी या जोडप्याच्या विवाह सोहळ्याला देखील उपस्थित होता. त्याने या केएल राहुलला कावासाकी निंजा बाईक भेट दिली आहे. या बाईकची किंमत सुमारे ८० लाख रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happiest City: जगातील टॉप रँकिंग सर्वात आनंदी शहर कोणते? जाणून घ्या

Shivali Parab : नजरेचा नखरा अन् नथीचा तोरा, शिवाली परबचं आरस्पानी सौंदर्य

Viral Video: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर जाताय? आताच सावध व्हा, फसवणुकीचा धक्कादायक व्हिडिओ समोर

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा बॉम्ब फुसका, भाजप नेत्याचा पलटवार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील राजुरामध्ये मतचोरी कशी झाली?, राहुल गांधींनी सांगितली संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT