kl rahul twitter
क्रीडा

KL Rahul: टीम इंडियाच्या हातून सामना निसटताच केएल राहुलची निवृत्ती? व्हायरल Video मुळे चर्चेला उधाण

Ankush Dhavre

KL Rahul News In Marathi: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरूत पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय संघातील अनुभवी फलंदाज के एल राहुल पूर्णपणे फ्लॉप ठरला.

पहिल्या डावात फलंदाजी करताना तो शून्यावर बाद झाला. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याला अवघ्या १२ धावा करता आल्या. त्यामुळे सोशल मीडियावर केएल राहुलला टार्गेट केलं जात आहे. दरम्यान एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यावरून असा दावा केला जातोय, की केएल राहुलने निवृत्ती जाहीर केली आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच, केएल राहुलने निवृत्ती घेतली की काय? अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सर्व खेळाडू हात मिळवणी करताना दिसून आले. तर केएल राहुल खेळपट्टीजवळ गेला.

केएल राहुल खेळपट्टीजवळ गेला आणि खाली बसला. त्यानंतर त्याने खेळपट्टीवरील धूळ चाखली. काही खेळाडू आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात असं करतात. केएल राहुलचा व्हिडिओ व्हायरल होताच, निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दुसऱ्या कसोटीतून बाहेर होणार?

पहिल्या कसोटीत शुभमन गिल दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यामुळे त्याच्याऐवजी सरफराज खानला संधी दिली गेली होती. तर केएल राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मात्र आता दुसऱ्या कसोटी सामन्यातून त्याची सुट्टी केली जाऊ शकते. त्याच्याजागी सरफराज खान खेळताना दिसून येऊ शकतो. तर शुभमन गिल प्लेइंग ११ मध्ये कमबॅक करू शकतो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांची निवडणुकीतून माघार

Shengdana Chutney: घरीच फक्त १० मिनिटांत बनवा शेंगदाणा चटणी; भाजी नसली तरीही खाल

MVA Latest News : ठाकरे गट आणि कॉंग्रेसचे स्वबळाचे वारे, महाआघाडी फुटीच्या उंबरठ्यावर ?

Nandurbar Rain : परतीच्या पावसाने शेतात ३ फुटांपर्यंत पाणी; पांढर सोनं झालं मातीमोल!

भारतात एकूण किती रेल्वे स्टेशन्स आहेत? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT