KKR vs SRH ipl 2024 playing xi prediction kolkata knight riders vs sunrisers hyderabad cricket news in marathi  twitter
Sports

KKR vs SRH, IPL 2024: KKR समोर हैदराबादचं आव्हान! कोण मारणार बाजी; कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad, IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

KKR vs SRH Playing XI Prediction:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता कोलकाताच्या इडन गार्डन्सवर रंगणार आहे. आयपीएलमध्ये कमबॅक करत असलेला श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर दुसरीकडे पॅट कमिन्स पहिल्यांदाच सनरायझर्स हैदराबाद संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग ११.

या खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा..

या सामन्यात रहमानुल्लाह गुरबाज आणि वेंकटेश अय्यर हे दोघेही डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. यासह श्रेयस अय्यर,नितिश राणा, रिंकू सिंग आणि आंद्रे रसल हे फलंदाज मध्यक्रमात फलंदाजी करताना दिसून येऊ शकतात. तर मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा या गोलंदाजांवर गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी असणार आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेइंग ११:

रहमानुल्लाह गुरबाज़ (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिशेल स्टार्क, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा. (Cricket news in marathi)

काही महिन्यांपूर्वीच पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप २०२३ स्पर्धा जिंकली होती. आता पॅट कमिन्स आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. या संघाकडून अभिषेक शर्ना आणि ट्रेव्हिस हेड हे डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. यासह राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, हेनरिक क्लासेन हे मध्यक्रमात खेळताना दिसून येऊ शकतात.

या सामन्यासाठी अशी असू शकते सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग ११:

ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज़ अहमद, पॅट कमिंस (कर्णधार), मयंक मारकंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आईला वर्दीत पाहून मिळाली प्रेरणा; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS झालेल्या पूजा गुप्ता आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT