final mitchell starc clean bowled abhishek sharma twitter
क्रीडा

Mitchell Starc: KKR चा पैसा वसूल! पहिल्याच ओव्हरमध्ये ड्रीम बॉल टाकत अभिषेक शर्माची केली दांडी गुल - Video

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादला चांगली सुरुवात करता आलेली नाही. (Mitchell Starc)

पहिल्याच षटकात हैदराबादला मोठा धक्का

हैदराबादचा संघ आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या हंगामात या संघाने प्रथम फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला आहे. याच आशेने सनरायझर्स हैदराबादने फायनलमध्येही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण पहिल्याच षटकात सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला.

तर झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडची जोडी मैदानावर आली होती. तर कोलकाता नाईट रायडर्सकडून मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला. त्याने सुरुवातीचे ४ चेंडू टाकल्यानंतर पाचव्या चेंडूवर अभिषेक शर्माची दांडी गुल केली. प्रत्येक डाव्या हाताच्या गोलंदाजासाठी हा ड्रीम बॉल असतो. मिचेल स्टार्क ओव्हर द विकेटचा मारा करत होता. त्यावेळी त्याने मधल्या स्टम्पवर चेंडू टाकला. जो टप्पा पडताच वळला आणि अभिषेक शर्माचा ऑफ स्टम्प उडवून गेला. हा चेंडू पाहून अभिषेक शर्माही शॉक झाला.

केकेआरचा पैसा वसूल

कोलकाता नाईट रायडर्स संघाने मिचेल स्टार्कला २४.७५ कोटी रुपये मोजत आपल्या संघात स्थान दिलं. यासह तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र मोक्याच्या क्षणी विकेट्स काढून देत त्याने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT