Maharashtra Live News Update: नागपुरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, संजय सरायकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६, महायुती आणि मविआमध्ये जागावाटप, राज्यात थंडी ओसरली, मुंबईत आजही पाऊस, आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Nagpur:  नागपुरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, संजय सरायकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

नागपूर -

- काँग्रेस नेते संजय सरायकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत संजय सरकार यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला

- संजय सरायकर यांनी 2007 आणि 2017 मध्ये काँग्रेस कडून महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती

- पण दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, 2007 मध्ये फक्त 13 मतांनी त्यांचा पराभव झाला होता

Pune: पुण्यात चायनिज मांज्यामुळे महिला जखमी

पुणे -

पुण्यात चायनिज मांज्यामुळे महिला जखमी

बोपखेल खडकी पुलावर घडली घटना

दुचाकीवरून जात होती महिला

महिलेच्या मानेला मांजा लागल्यामुळे महिला जखमी

स्थानिकांनी तात्काळ मदत करत मांजा तोडून केला बाजूला

Pune: नाराजांची मनधरणी होणार? इच्छुक त्यांच्या निर्णयावर ठाम राहणार?

पुणे -

नाराजांची मनधरणी होणार? इच्छुक त्यांच्या निर्णयावर ठाम राहणार?

अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस

महापालिकेसाठी महायुती आघाडीचे चित्र होणार स्पष्ट

पहिल्या दिवशी निवडणुकीतून 67 जणांनी घेतली माघार

बंड थंड करण्यासाठी पक्षांकडून प्रयत्न सुरू

अनेक पक्षाने युती आघाडी न झाल्याने जास्तीचे एबी फॉर्म दिले असल्याने वरिष्ठ नेत्यांच्याही बैठका सुरू

दुपारी ३ पर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत

Pandharpur: लव्हजिहाद विरोधात अरण ते पुणे पदयात्रा

पंढरपूर -

लव्हजिहाद विरोधात अरण ते पुणे पदयात्रा

अखंड हिंदू राष्ट्र निर्माण व्हावे यासाठी व लव्हजिहाद विरोधात सोलापूर जिल्ह्यातील अरण ते पुणे अशी हिंदू जनजागरण पदयात्रा काढली जाणार आहे.

अरण येथील महाकाली मठात हिंदू जनजागरण समितीची बैठक झाली.

या बैठकीत पदयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अखंड हिंदू राष्ट्र निर्माण व्हावे व महाराष्ट्रातील लव्हजिहाद नष्ट व्हावा यासाठी दहा दिवस पदयात्रा काढून जनजागृती केली जाणार आहे.

या पदयात्रेत सुमारे एक हजार साधू सहभागी होणार आहेत.

Pune: महापालिका निवडणुकीपूर्वी पुणे पोलिसांची धडक कारवाई

पुणे -

महापालिका निवडणुकीपूर्वी पुणे पोलिसांची धडक कारवाई

नऊ सराईत गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

निवडणूक शांततेत, निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांनी उचलली कडक पावले

परिमंडळ-एक अंतर्गत येणाऱ्या खडक, डेक्कन आणि फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील नऊ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

त्यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com