Sanju Samson KKR Vs RR IPL 2025 X
Sports

KKR Vs RR : रियान परागची वादळी झुंज अपयशी, अटीतटीच्या सामन्यात १ धावेने केकेआरने मारली बाजी

KKR Vs RR IPL 2025 : ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना शेवटच्या चेंडूवर केकेआरने जिंकला. या विजयानंतर केकेआरने पॉईंट्स टेबलवर सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.

Yash Shirke

IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या आयपीएल २०२५ च्या ५३ व्या सामन्यामध्ये केकेआरचा फक्त एका धावेने विजय झाला. या विजयानंतर पॉईंट्स टेबलवर कोलकाताने सहावे स्थान पटकावले आहे. रियान परागने वादळी ९५ धावा केल्या. त्याची विकेट पडल्यानंतर अन्य खेळाडूंना राजस्थानचा विजय निश्चित करता आला नाही.

कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणेने टॉस जिंकला. रहाणेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी २० ओव्हर्समध्ये २०६ धावा करत राजस्थानच्या समोर २०७ धावांचे आव्हान ठेवले. लक्ष्य गाठताना राजस्थानने २०५ धावा केल्या. फक्त १ धाव न केल्याने राजस्थानचा विजय झाला.

सलामीसाठी आलेला सुनील नारायण दुसऱ्याच ओव्हरमध्ये माघारी परतला, त्याने ११ धावा केल्या. गुरबाज ३५ धावांवर बाद झाला. संयमी खेळत अजिंक्य रहाणेने २४ चेंडूत ३० धावा केल्या. अंगकृष रघुवंशीने ४४ धावा करत मधल्या ओव्हर्समध्ये मोर्चा सांभाळला. २२८ च्या स्ट्राईक रेटने आंद्रे रसेलने २५ चेंडूत ५७ धावा केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये रिंकू सिंहने १९ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला जोफ्रा आर्चर, युधवीर सिंह, महेशा थीक्ष्णा आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या.

२०७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी फलंदाजीसाठी आले. पहिल्याच ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशी चौकार मारत बाद झाला. त्यानंतर पदार्पण करणारा कुणाल सिंग राठोडचीही विकेट पडली. एका बाजूने रियान परागने खिंड लढवली. कुणालच्या जागी आलेला ध्रुव जुरेल शून्यावर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर वानिंदू हसरंगाही बाद झाला. रियानने हेटमायर आणि शुभम दुबे यांच्या साथीने मोर्चा सांभाळला. रियान परागने ४५ चेंडूत ९५ धावा केल्या. रियानच्या विकेटनंतर शुबम दुबे आणि जोफ्रा आर्चरने लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळाले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Bigg Boss 19: 'मी टीव्हीचा सुपरस्टार आहे...'; बिग बॉसमध्ये नवा वाद, फरहानाला गौरवने सुनावले खडेबोल

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT