KKR vs RR IPL 2024 pitch Report playing XI match prediction and weather prediction twitter
Sports

KKR vs RR: ईडन गार्डन्सवर कोलकाता - राजस्थान भिडणार! जाणून घ्या पिच रिपोर्ट, प्लेइंग ११ अन् मॅच प्रेडिक्शन एकाच क्लिकवर

KKR vs RR, Pitch Report And Match Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. स्पर्धेतील ३१ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. स्पर्धेतील ३१ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. कारण दोन्ही संघ या स्पर्धेतील मजबूत संघ आहेत. सध्या दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या दुसऱ्या स्थानी आहेत. दरम्यान या सामन्यात खेळपट्टी कोणाला साथ देणार? जाणून घ्या.

खेळपट्टी कोणाला देणार साथ?

हा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाचं होम ग्राउंड ईडन गार्डन्सवर रंगणार आहेत. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. तसेच नवीन चेंडूने वेगवान गोलंदाजांना चांगलीच मदत मिळते. त्यामुळे सुरुवातीच्या काही षटकांमध्ये विकेट्स जाण्याची देखील भीती असू शकते. मात्र दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म पाहता ,क्रिकेट चाहत्यांना हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो.

असा राहिलाय हेड टू हेड रेकॉर्ड..

या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर, दोन्ही संघामध्ये आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत २७ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान १४ वेळेस कोलकाताने बाजी मारली आहे. तर राजस्थानला १३ सामने जिंकता आले आहेत.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

राजस्थान रॉयल्स- यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार,यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, युजवेंद्र चहल आणि कुलदीप सेन.

कोलकाता नाईट रायडर्स- फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रमनदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, मिशेल स्टार्क, वैभव अरोडा आणि हर्षित राणा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

SCROLL FOR NEXT