bhuvneshwar kumar twitter
Sports

Bhuvneshwar Kumar: RCBचा शॉकिंग निर्णय! पहिल्याच सामन्यातून भुवनेश्वर कुमार बाहेर; नेमकं कारण काय?

KKR vs RCB, Bhuvneshwar Kumar: आरसीबी आणि केकेआर यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या सामन्यातून भुवनेश्वर कुमारला प्लेइंग ११ मध्ये संधी देण्यात आलेली नाही.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊनही रजतने भुवनेश्वर कुमारला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलेलं नाही.

भुवनेश्वर कुमार प्लेइंग ११ मधून बाहेर

हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरु आहे. या खेळपट्टीवर स्विंग गोलंदाजांना मदत मिळते. मुख्य बाब म्हणजे, सामन्याच्या एक दिवसाआधी कोलकात्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती.

त्यामुळे वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळाला असता. मात्र रजत पाटीदारने स्विंगचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुवनेश्वर कुमारला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या प्लेइंग ११ मध्ये वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड, रसिख डार सलाम आणि यश दयाल यांना स्थान दिलं आहे. भुवनेश्वर कुमारला प्लेइंग ११ मध्ये स्थान न दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

भुवनेश्वर कुमारला बाहेर ठेवण्यामागचं नेमकं कारण काय?

भुवनेश्वर कुमार गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसून आला होता. त्यानंतर त्याला या संघाने रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात आरसीबीने त्याला १०.७५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं. भुवनेश्वर कुमार संघात आल्यानंतर आरबीसीच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र पहिल्याच सामन्यातून त्याला वगळण्यात आलं आहे. भुवनेश्वर कुमारला प्लेइंग ११ मध्ये स्थान का दिलं गेलेलं नाही. याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Playing XI): विराट कोहली, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, क्रुणाल पांड्या, रासिख दर सलाम, सुयश शर्मा, जॉश हेजलवूड, यश दयाल.

कोलकाता नाईट रायडर्स (Playing XI): क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंकृष रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रामंदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT