IPL Century: हजारो धावा, अनेक विक्रम, पण आयपीएलमध्ये या खेळाडूंचे एकही शतक नाही

Dhanshri Shintre

आयपीएल 2025

आयपीएल 2025 चा 18वा हंगाम आजपासून सुरू होत असून, पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यात रंगणार आहे.

पहिला सामना

कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाईल. आयपीएलचा अंतिम सामना 25 मे रोजी होणार असून, चाहते आधीच 2025 हंगामाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

भारतीय खेळाडू

आज आपण त्या भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयपीएल इतिहासात एकही शतक झळकावलेले नाही. चला, सविस्तर पाहूया.

महेंद्रसिंग धोनी

शतक न झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर कॅप्टन कुल एमएस धोनी आहेत, ज्यांनी अनेकदा संघाला संकटातून तारले आहे.

सर्वोत्तम नाबाद खेळी

आयपीएलच्या इतिहासात धोनीला अद्याप शतक झळकावता आलेले नाही. त्याची सर्वोत्तम नाबाद खेळी 84 धावांची आहे. यंदा तो शतक करतो का, याकडे लक्ष असेल.

दिनेश कार्तिक

भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिक या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये त्याने 20 अर्धशतके झळकावली असली, तरी शतक नाही.

राहुल द्रविड

टीम इंडियाचा माजी फलंदाज ‘द वॉल’ राहुल द्रविड या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. आयपीएल कारकिर्दीत त्याने फक्त अर्धशतके झळकावली, पण शतक नाही.

गौतम गंभीर

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी खेळाडू गौतम गंभीर आयपीएल शतकविहीन खेळाडूंमध्ये आहेत. त्यांनी आयपीएलमध्ये एकूण 4217 धावा केल्या, पण शतक झळकावले नाही.

युवराज सिंग

या यादीत भारतीय संघाचा माजी सलामीवीर युवराज सिंग देखील समाविष्ट आहे, ज्याने आयपीएलमध्ये शतक झळकावले नाही.

NEXT: IPL च्या ट्रॉफीवर संस्कृतमध्ये काय लिहिले आहे? त्याचा अर्थ काय?

येथे क्लिक करा