Dhanshri Shintre
IPL ची ट्रॉफी जर तुम्ही लक्ष देऊन पाहिली तर त्याच्यावर तुम्हाला संस्कृतमध्ये काहीतरी लिहिलेलं दिसेल.
तर आयपीएलच्या ट्रॉफीवर संस्कृतमध्ये हा श्लोक का लिहिला आहे आणि याचा अर्थ तरी नेमका काय आहे? जाणून घ्या.
IPL च्या ट्रॉफीवर संस्कृतमध्ये "यत्र प्रतिभा अवसर प्राप्नोतिही" असे लिहिले आहे.
या श्लोकचा अर्थ इथे प्रतिभेला संधी मिळते असा होतो.
IPL मुळे बऱ्याच खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळतो संधी मिळते आणि इथूनच ते पुढे भारतीय संघात आपली जागा प्राप्त करतात.
त्यामुळे हा श्लोक IPL चे ब्रीदवाक्य देखील आहे. यासोबतच IPL मध्ये टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक बॉलची किंमत किती?
आयपीएलमध्ये टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक बॉलची किंमत तब्बल ४९ लाख रुपये इतकी असते.
तर आयपीएल २०२३–२०२७ या पाच वर्षासाठी बीसीसीआयने ४१० सामन्यांचे ब्रॉडकास्टिंग अधिकारी ४८३९० कोटी रुपयांना विकले आहेत.
आयपीएलचा प्रत्येक सामना ११८ कोटीचा, प्रति ओव्हर २.९५ कोटी, त्यामुळेच प्रत्येक बॉल हा ४९ लाख रुपयांचा अशी किंमत होते.