Bhuvneshwar Kumar: W,W,W..स्विंगचा किंग फॉर्ममध्ये परतला! 4 ओव्हर अन् 6 धावा खर्च करत घेतली हॅट्रीक

Bhuvneshwar Kumar Hat Trick: भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत हॅट्रीक घेण्याचा कारनामा केला आहे.
Bhuvneshwar Kumar: W,W,W..स्विंगचा किंग फॉर्ममध्ये परतला! 4 ओव्हर अन् 6 धावा खर्च करत घेतली हॅट्रीक
bhuvneshwar kumartwitter
Published On

Bhuvneshwar Kumar News In Marathi: भारतात सय्यद मुश्ताक अली टी-२० लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत युवा भारतीय खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसून येत आहेत. यासह अनुभवी खेळाडूंसाठीही भारतीय संघात कमबॅक करण्याची सुवर्णसंधी आहे.

भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार देखील मैदानात उतरला आहे. दरम्यान मैदानात येताच त्याने शानदार गोलंदाजी करुन दाखवली आहे. झारखंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने भेदक मारा करत हॅट्रीक घेण्याचा कारनामा करुन दाखवला आहे.

Bhuvneshwar Kumar: W,W,W..स्विंगचा किंग फॉर्ममध्ये परतला! 4 ओव्हर अन् 6 धावा खर्च करत घेतली हॅट्रीक
IND vs AUS Match Time: भारत- ऑस्ट्रेलिया दुसरा सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होईल?

भुवनेश्वर कुमारने घेतली हॅट्रीक

झारखंड विरुद्ध उत्तर प्रदेश या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात उत्तर प्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर ८ गडी बाद १६० धावा केल्या. उत्तर प्रदेश संघाकडून फलंदाजी करताना रिंकू सिंगने २८ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची वादळी खेळी केली.

Bhuvneshwar Kumar: W,W,W..स्विंगचा किंग फॉर्ममध्ये परतला! 4 ओव्हर अन् 6 धावा खर्च करत घेतली हॅट्रीक
IND vs AUS: फॅन्सला नो एन्ट्री! BGT सुरु असताना घेतला मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

तर प्रियम गर्गने २५ चेंडूंचा सामना करत ३१ धावांची खेळी केली. झारखंडला हा सामना जिंकण्यासाठी १६१ धावा करायच्या होत्या. मात्र या संघाचा डाव १५० धावांवर आटोपला. यासह उत्तर प्रदेश संघाने हा सामना १० धावांनी आपल्या नावावर केला.

उत्तर प्रदेश संघाकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. त्याने या सामन्यात गोलंदाजी करताना, ४ षटकात अवघ्या ६ धावा खर्च केल्या आणि ३ गडी बाद केले.

भुवनेश्वर कुमार गेले काही वर्ष सनरायझर्स हैदराबादकडून खेळत होता. मात्र आगामी हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना दिसून येणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विश्वास दाखवत त्याला या संघात स्थान दिलं आहे.

हा विश्वास सार्थ ठरवण्याची संधी त्याच्याकडे असणार आहे. आतापर्यंत त्याने हैदराबादसाठी शानदार कामगिरी केली आहे. अशीच कामगिरी तो बंगळुरुकडून खेळताना करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

बडोदाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत एकपेक्षा एक मोठे रेकॉर्ड बनवले जात आहेत. बडोदा आणि सिक्कीम यांच्यात झालेल्या सामन्यात बडोदाच्या फलंदाजांनी चौकार- षटकारांचा पाऊस पाडत टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. बडोदाने २० षटकअखेर ३४९ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com