kkr vs rcb twitter
Sports

KKR vs RCB, 1st Inning: रहाणे- नरेनची वादळी सुरुवात; शेवटी RCBचं दमदार कमबॅक; KKRला १७४ धावांवर रोखलं

KKR vs RCB Live Score: आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेतील सलामीचा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरु आहे. हा सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला १७४ धावा करता आल्या आहेत.

या सामन्यात रजत पाटीदार पहिल्यांदाच रॉयल चॅलंजर्स बंगळुरु संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला. पहिल्याच सामन्यात कर्णधार म्हणून त्याने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

हा निर्णय आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चुकीचा ठरवला होता. केकेआरला सुरुवातीला मोठा धक्का बसला. मात्र त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेनने मिळून डाव सांभाळला आणि केकेआरला मजबूत स्थितीत पोहोचवलं.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून क्विंटन डी कॉक आणि सुनील नरेन ही जोडी मैदानावर आली होती. मात्र डी कॉक अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. त्यानंतर सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणेने मिळून शानदार भागीदारी केली. सुनील नरेनने या डावात २६ चेंडूंचा सामना करत ४४ धावांची खेळी केली. तर कर्णधार अजिंक्य रहाणेने ३१ चेंडूंचा सामना करत ५६ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. ही जोडी आऊट झाल्यानंतर धावांची गती कमी झाली. वेंकटेश अय्यर अवघ्या ६ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर शेवटी अंगक्रीश रघुवंशीने २२ चेंडूंचा सामना करत ३० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर कोलकाताने २० षटकअखेर १७४ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला हा सामना जिंकण्यासाठी १७५ धावांची गरज आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Playing XI): विराट कोहली, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, क्रुणाल पांड्या, रासिख दर सलाम, सुयश शर्मा, जॉश हेजलवूड, यश दयाल.

कोलकाता नाईट रायडर्स (Playing XI): क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंकृष रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रामंदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sneha Wagh: आता मुंबई आपलीशी वाटत नाही...; यूपीतून परत आल्यावर अभिनेत्री स्नेहा वाघ असं का म्हणाली?

High cholesterol symptoms: डोळ्यापासून-पायांपर्यंत...! पाहा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या अवयवांमध्ये दिसतात लक्षणं?

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT