KKR vs MI ramandeep singh fined 20 percent from bcci for breaching ipl code of conduct amd2000 google
क्रीडा

Ramandeep Singh Fined: प्लेऑफ गाठल्यानंतर KKR ला मोठा धक्का! स्टार खेळाडूवर BCCI ची मोठी कारवाई

Ankush Dhavre

कोलकाताच्या इडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. पावसामुळे हा सामना उशीराने सुरु झाला. शेवटी हा सामना १६-१६ षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने १५७ धावा केल्या.

या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला १३९ धावा करता आल्या. दरम्यान या सामन्यातील विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्लेऑफचं तिकीट मिळालं आहे. मात्र सामन्यानंतर रमनदीप सिंगवर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडू रमनदीप सिंगने आयपीएलच्या आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्याच्यावर मॅच फी च्या २० टक्के दंड आकारण्यात आला आहे.

आयपीएलने आपल्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले आहे की, ' कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये कोलकाताच्या इडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात रमनदीप सिंगने आयपीएलच्या आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्याच्यावरच फी च्या २० टक्के दंड आकारण्यात आला आहे.

या प्रेस रिलीझमध्ये पुढे म्हटलं गेलं आहे की, रमनदीप सिंगने आपली चूक मान्य केली आहे. मात्र त्याने काय चूक केली हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आयपीएलच्या आचारसंहितेच्या आर्टीकल २.२० च्या नियमानुसार, एखाद्या खेळाडूची कृती खेळ भावनेच्या विरोधात असेल, तर त्याच्यावर कारवाई केली जाते. सामना पाहणाऱ्यांनी असं म्हटलं आहे की, रमनदीप सिंग अशी कुठलीच कृती करताना दिसून आलेला नाही. त्याच्यावर कारवाई का करण्यात याबाबत सामनाधिकाऱ्यांनी कुठलीच माहिती दिलेली नाही.

कोलकाताचा विजय..

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने १६ षटकअखेर १५७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला १३९ धावा करता आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT