KKR vs MI Saam Digital
क्रीडा

KKR vs MI : मुंबईसमोर कोलकाताचं १६ षटकात १५८ धावांचं लक्ष्य; सामन्यात पावसाचा व्यत्यय

Sandeep Gawade

पावसाच्या व्यत्ययामुळे मुंंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजचा सामना उशिरा सुरू झाला. सुरुवातीला एकापाठोपाठ विकेट पडल्यामुळे धावा खूपच कमी होत्या मात्र वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल आणि नितीश राणा यांच्या फटकेबाजीमुळे १६ षटकात कोलकाता संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. १६ षटकात १५८ धावांचं लक्ष्य मुंबई इंडियन्स समोर ठेवण्यात आलं आहे.

सामना २ तास १५ मिनिटे उशिरा सुरू झाला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघ मैदानात उतरला होता. मात्र नुवान तुषारने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला तंबूत धाडलं. सुनील नरेनचा बुमराहच्या यॉर्करवर त्रिफळा उडाला. त्यानंतर श्रेयस अय्यर ७ धावांवर तंबूत परतला. कोलकाताची अवस्था ४० धावांवर तीन गडी बाद अशी झाली होती.

१२व्या षटकात नितीश रन आऊट झाला त्याने २३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकाराच्या मदतीवर ३३ धावा केल्या. तिलक वर्माने त्याला धावबाद केलं. पुढच्या षटकात पियूषने आंद्रे रसेलला २३ धावांनर तंबूत धाडलं. जसप्रीतने शेवटच्या षटकात १२ चेंडूंत २० धावा करणाऱ्या रिंकू सिंगला माघारी धाडलं. रमणदीपने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून कोलकाताला ७ बाद १५७ धावांपर्यंत पोहोचवलं. 

कोलकाताने १६ षटकांत ७ गडी गमावून १५७ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने २१ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. मुंबईसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने उत्तम प्रदर्शन करत प्रत्येकी २ बळी घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral News: दिल्ली मेट्रोत चाललंय तरी काय? अश्लील डान्सनंतर आता रंगला पत्त्यांच्या डाव; VIDEO पाहून अनेकांचा संताप

Assembly Election 2024: राजकीय सभांचा डबल धमाका! PM मोदींची ठाण्यात तर राहुल गांधींची कोल्हापुरात 'तोफ' धडाडणार; वाचा सविस्तर..

Amravati News : अमरावतीत मध्यरात्री मोठा तणाव, संतप्त जमावाने पोलीस स्टेशन फोडलं; दगडफेकीत २९ पोलीस जखमी

Rain Alert : आजपासून या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Horoscope Today : नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल, जोडीदाराची भेट होईल, आज तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT