IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या चिंतेत वाढ! घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह IPL 2023 स्पर्धेतून बाहेर

स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच ५ वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे
jasprit bumrah
jasprit bumrahSaam TV

IPL 2023 Jasprit Bumrah injury update: आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. काही संघांनी या स्पर्धेसाठी सराव करायला सुरुवात केली आहे. तर स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच ५ वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

जसप्रीत बुमराह हा आयपीएल स्पर्धेतुन बाहेर झाला आहे. तो पाठीच्या दुखण्याच्या समस्येने त्रस्त आहे. हेच कारण आहे की, तो यावेळी मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसून येणार नाहीये. (Latest Sports Updates)

पाठीच्या दुखण्यामुळे जसप्रीत बुमराह हा गेल्या ५ महिन्यांपासून संघाबाहेर आहे. आता त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. तो अद्यापही दुखापतीतून सावरलेला नाहीये. या दुखापतीमुळे त्याला गतवर्षी झालेल्या आशिया चषक आणि आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिले गेले नव्हते. तसेच जर भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर या सामन्यात देखील जसप्रीत बुमराह खेळताना दिसून येणार नाहीये.

jasprit bumrah
IND VS AUS 3rd Test: फिरकीनेच केला टीम इंडियाचा घात ! भारताचा पहिला डाव १०९ धावांवर संपुष्टात

सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये जसप्रीत बुमराहच्या दुखापतीवर उपचार सुरु आहेत. तसेच त्याला शस्त्रक्रिया करण्याचा देखील सल्ला देण्यात आला आहे. अनेक मालिका सुरु होण्यापूर्वी जसप्रीत बुमराह खेळणार असल्याची चर्चा झाली होती. मात्र मालिका सुरु होताच तो मालिकेतून बाहेर झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी जसप्रीत बुमराह पुनरागमन करणार होता. मात्र त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याची निवड करण्यात आली नाहीये. बीसीसीआय जसप्रीत बुमराहच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याच्या विचारात आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहबाबत कुठलीही रिक्स घेतली जात नाहीये.

jasprit bumrah
IND vs AUS 3rd Test: इंदोर कसोटीत मोडले जाणार मोठे विक्रम! अश्विन, जडेजा अन् सिराजकडे इतिहास रचण्याची संधी

मुंबई इंडियन्सला होणार मोठं नुकसान..

जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्याने मुंबई इंडियन्सच्या चिंतेत नक्कीच भर पडणार आहे. या हंगामात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्स संघाला लीड करताना दिसून येणार आहे. गतवर्षी जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्स संघाला लीड केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com