KKR vs DC Head to head record kolkata knight riders vs delhi capitals news in marathi amd2000 yandex
Sports

KKR vs DC, IPL 2024: आज कोलकाता -दिल्ली आमने सामने ! कोणाचं पारडं राहिलंय जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

KKR vs DC, Head To Head Record: आज होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दरम्यान कसा राहिलाय या दोन्ही संघांचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४७ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ दिल्ली कॅपिटल्स संघासोबत दोन हात करताना दिसून येणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्स संघावर १० धावांनी विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाला गेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड...

दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर दोन्ही संघ ३३ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाने १५ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने १७ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगणार आहे.

त्यामुळे होम ग्राऊंडवर खेळण्याचा कोलकाता नाईट रायडर्स संघाला नक्कीच फायदा होईल. गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं, तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत. १० गुणांसह हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाने १० पैकी ५ सामने जिंकले असून १० गुणांसह सहाव्या स्थानी आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११...

कोलकाता नाईट रायडर्स- फिल साल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, वैभव अरोडा, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

इम्पॅक्ट प्लेअर- सुयश शर्मा, अनुकूल रॉय, मनीष पांडे, रमनदीप सिंग, रहमानुल्लाह गुरबाज

दिल्ली कॅपिटल्स- जेक फ्रेजर-मॅकगर्क, कुमार कुशाग्र, शाई होप,रिषभ पंत (यष्टीरक्षक/ कर्णधार ), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिजाद विलियम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.

इम्पॅक्ट प्लेअर- रसिख दार सलाम, प्रवीण दुबे, विक्की ओस्तवाल, रिकी भुई, सुमित कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Decision: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! गणेश उत्सवानिमित्त प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Shrirampur Crime : हातात बंदुका घेऊन पाठलाग; श्रीरामपुरमध्ये टोळी युद्धाची भीती, घटना सीसीटीव्हीत कैद

Viral Video: आधी हात जोडून नमस्कार केला, मग एक मराठा, लाख मराठा घोषणा दिल्या; फॉरेनरने जिंकली सर्वांचीच मने

Allu Arjun Grandmother Death: अल्लू अर्जुनच्या कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन

Maharashtra Live News Update: मला जिल्हा परिषद अध्यक्ष करा - हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT