kiran navgire selected in indian team.  saam tv
Sports

Kiran Navgire : इंग्लंड दाै-यासाठी लेडी धाेनीचा भारतीय संघात समावेश; महाराष्ट्रात चैतन्य

आमदार राेहित पवार यांनी किरण नवगिरेस ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

भारत नागणे

Kiran Navgire : मिरे (ता. माळशिरस) येथील किरण नवगिरे (Kiran Navgire Latest Marathi News) हिची इंग्लंड येथे हाेणा-या ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झालली आहे. या निवडीमुळं माळशिरसह (malshiras) संपुर्ण साेलापूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींत आनंदाचे वातावरण आहे.

किरण सध्या नागालँड संघाकडून खेळत होती. आजवर महिला क्रिकेट संघाला न मिळविता आलेला विश्वकरंडक जिंकणे हे तिचे स्वप्न असल्यानेच ती कसून मेहनत घेत आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून किरणनं आपल्या कुटुंबियांच्या पाठबळाच्या जाेरावर क्रिकेटमध्ये पदकं मिळविली आहेत.

किरण एक उत्कृष्ट फलंदाज आहे. षटकार ठाेकण्यात ती माहिरी आहे. सिक्स हिटर अशी स्वत:ची ओळख तिने निर्माण केली आहे. तिला लेडी धाेनी नावानं देखील आेळखलं जातं. किरणने प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. येत्या १० सप्टेंबर पासून महिला क्रिकेटचा इंग्लंड दौरा सुरु होत आहे. तिच्या निवडीनं पंचक्राेशिसह उत्साहाचे वातावरण आहे. अनेकांनी तिचे शुभेच्छा फलक तसेच अभिनंदनाचे फलक गावात लावले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT