IPL 2026 Delhi Capitals (File Pic : social media) Saam tv
Sports

IPL 2026 सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, दिग्गजानं सोडली संघाची साथ

IPL 2026, Delhi Capitals : आयपीएल स्पर्धा सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका बसला आहे. महत्वाची भूमिका बजावणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूनं अचानक संघाची साथ सोडली आहे.

Nandkumar Joshi

हर्षित राणाच्या रुपानं कोलकाता नाइट रायडर्स संघाला पहिला झटका बसला असतानाच, आता दिल्ली कॅपिटल्स संघालाही आयपीएल स्पर्धा सुरू होण्याआधी मोठा हादरा बसला आहे. माजी क्रिकेटपटू आणि संघाचा मेंटॉर केविन पीटरसन यानं दिल्ली संघाची साथ सोडली आहे. त्यानं पदाचा राजीनामा दिला आहे. पीटरसन यानं स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यंदाच्या स्पर्धेत दिल्ली संघासोबत नसेल असं त्यानं स्पष्ट केलं आहे. मागील वर्षीच त्यानं दिल्ली कॅपिटल संघाचा मेंटॉर म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.

केविन पीटरसन यानं सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. यावर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाचा मेंटॉर नसेल. मात्र, आयपीएलसाठी कमेंटेटरच्या भूमिकेत असेल, असं त्यानं स्पष्ट केलं आहे. तसेच त्यानं दिल्ली कॅपिटल्स संघ आणि खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या आहेत.

गेल्या वर्षी पीटरसनवर टीका

गेल्या वर्षी केविन पीटरसन स्पर्धा सुरू असतानाच, सुट्टीवर गेला होता. दिल्ली कॅपिटल्सचे त्यावेळी तीनच सामने झाले होते. यावर टीकाही झाली होती, असं सांगितलं जातं. यंदाच्या वर्षी केविन पीटरसन मेंटॉर नसेल. त्यामुळे नवीन मेंटॉर कोण असेल याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आली नाही. विशेष म्हणजे लखनऊ सुपर जायंट्स संघाकडेही मेंटॉर नाही.

दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना कधी?

बीसीसीआयने नुकतेच आयपीएल २०२६ या स्पर्धेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना १ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरोधात होणार आहे. हा सामना लखनऊत होणार आहे. त्यानंतर ४ एप्रिलला मुंबई इंडियन्स, ८ एप्रिलला गुजरात टायटन्स आणि ११ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्जविरोधात लढत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'नीट'मुळे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर, कधी होणार महाटीईटीची परीक्षा? नवी तारीख जाहीर

Maharashtra News Live Update: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ३ ट्रकचा भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

Sugar Free Sweet Recipes : गोड खाण्याची इच्छा होतेय? झटपट बनवा 'हा' शुगर फ्री हलवा, मधुमेही रूग्णही आवडीने खातील

Vastu Shastra: पैशाची चणचण, जीवनात अडी-अडचण येतेय? अंथरुणातील 'ही' चूक बदलतेय तुमची ग्रह दशा

गुजरातमध्ये पैशांचा पाऊस, पोती भरून भरून उधळल्या गायकावर नोटा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT