Vijay Hazare Trophy Final X (Twitter)
Sports

Vijay Hazare Trophy Final : कर्नाटकाच्या पोरांनी मैदान मारलं; विजय हजारे ट्रॉफीवर कोरलं नाव, ५ वर्षांनी जिंकला खिताब

Vijay Hazare Trophy Final Result : आज वडोदरा स्टेडियममध्ये विजय हजारे ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना खेळला गेला. या अंतिम सामन्यात कर्नाटकने विदर्भाचा ३६ धावांनी पराभव करत इतिहास रचला.

Yash Shirke

Vijay Hazare Trophy Final : विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना आज वडोदरा स्टेडियममध्ये पार पडला. विदर्भ आणि कर्नाटक यांच्यातील लढाईत कर्नाटकच्या संघाने विजय मिळवला. कर्णधार मयंक अगरवालच्या नेतृत्वाखाली कर्नाटकने विदर्भ संघाचा ३६ धावांनी पराभव केला. या विजयानंतर कर्नाटकच्या संघाने पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकत इतिहास रचला. स्मरण रविचंद्रनचे तुफानी शतक, भेदक गोलंदाजीमुळे कर्नाटकला विजयाची पंचमी साजरी करता आली.

सामन्यापूर्वी विदर्भाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटक संघाकडून स्मरण रविचंद्रनने सर्वाधिक १०१ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त केएल श्रीजीथ आणि अभिनव मनोहरनेही चांगली कामगिरी केली. कर्णधार मयंक अगरवाल ३२ धावा करुन परतला. विदर्भाच्या गोलंदाजांनी कर्नाटक संघाला ३४८ धावांवर रोखले.

पुढे विदर्भाचे फलंदाज मैदानात उतरले. स्मरण रविचंद्रनच्या शतकाला प्रतिउत्तर देत विदर्भाकडून सलामीवीर ध्रुव शौरीने शतक ठोकले. त्याने सर्वाधिक ११० धावा केल्या. दरम्यान कर्नाटकच्या गोलंदाजांनी विदर्भाच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. हळूहळू विदर्भाच्या संघातील खेळाडू बाद होत गेले. गोलंदाजीच्या बळावर कर्नाटकचा विजय झाला.

विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कर्नाटकचा स्मरण रविचंद्रन हा 'प्लेयर ऑफ द मॅच' बनला. तर 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट'चा खिताब विदर्भ संघातील करुण नायरला मिळाला. संपूर्ण स्पर्धेमध्ये करुण नायरचा चांगला फॉर्म होता. त्याने पाच सामन्यात शतकीय कामगिरी केली. पण अंतिम सामन्यात तो फक्त २७ धावांवर बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

SCROLL FOR NEXT