कर्णम मल्लेश्‍वरी क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरू साम टिव्ही
Sports

वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्‍वरी क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरू

दिल्ली सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला दिल्ली क्रीडा विद्यापीठ सुरू होत असून, त्याच्या पहिल्या कुलगुरू होण्याचा मान प्रसिद्ध वेटलिफ्टर आणि पहिल्या महिला ऑलिंपिक पदकविजेत्या कर्णम मल्लेश्‍वरी यांना देण्यात आला

साम टिव्ही

नवी दिल्ली : दिल्ली New Delhi सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला दिल्ली क्रीडा विद्यापीठ Delhi Sports University सुरू होत असून, त्याच्या पहिल्या कुलगुरू Vice Chancellor होण्याचा मान प्रसिद्ध वेटलिफ्टर आणि पहिल्या महिला ऑलिंपिक पदकविजेत्या कर्णम मल्लेश्‍वरी Karnam Malleshwari यांना देण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. Karnam Malleshwar Vice Chancellor of Sports University in New Delhi

खेळाडूंना चांगले प्रशिक्षण देऊन त्यांनी देशाचा नावलौकिक वाढवावा, खेळाडूंच्या प्रतिभेला चालना मिळावी या उद्देशाने दिल्ली सरकार क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची योजना आखली होती. त्यानुसार आता हे विद्यापीठ सुरू होत आहे.

हे देखिल पहा

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, की विविध खेळांमध्ये खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये ५० पदके जिंकून देशाचा गौरव वाढवावा. त्यादृष्टीने हे विद्यापीठ महत्त्वपूर्ण कामगिरी करेल.विद्यापीठात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. किमान दहा खेळांमधील आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

या विद्यापीठातून मिळणारी पदवी ही इतर मुख्य प्रवाहातील पदव्यांना समकक्ष असेल. जगातील सर्वोत्तम क्रीडा विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाची गणना होईल, अशा पद्धतीने त्यांची उभारणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली सरकारने २०१९ मध्ये दिल्ली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी (डीएसयू) स्थापन करण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर केले होते. या विद्यापीठात पदवीबरोबरच पदव्युत्तर आणि पीएचडी देखील दिली जाणार आहे, अशीही माहिती सिसोदिया यांनी दिली आहे.

Edited By- Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्ये रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

SCROLL FOR NEXT