रामनाथ दवणे
नवी मुंबई : नवी मुंबई New Mumbai आंतरराष्ट्रीय विमानतळाला Airport दि. बा. पाटील D B Patil यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आज सिडकोला CIDCO घेराव घालणार आहेत. अशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलं आहे. नवी मुंबई, पनवेल, मुंबई, पुणे,ठाणे,पालघर मधील 5 हजार पोलीस Police अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत. Bhimiputra Agitation For Naming Of New Mumbai International Airport.
राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. दंगल नियंत्रण पोलीस पथक देखील सदर ठिकाणी दाखल झाले आहे. रायगड,ठाणे,पालघर,जिल्ह्यातील जवळपास 1 लाख प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र Bhumiputra आंदोलनात सहभागी होणार आहेत. पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्यावर गावकाऱ्यांना रोखण्यात येणार आहे.
हे देखील पहा -
दरम्यान काल नवी मुंबई परिसरातील 1 हजार प्रकल्पग्रस्तांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. पोलीस काल संध्याकाळ पासून प्रकल्पग्रस्त नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरवात करणार आहेत. पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्यावर गावकाऱ्यांना रोखण्यात येणार आहे. आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची खबरदारी घेऊन नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
तसेच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर ठाणे बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे.
तर कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाईल. तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईत येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.