Kane Williamson  Twitter
क्रीडा

Kane Williamson Injury: IPL खेळणं पडलं महागात! न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन मोठ्या स्पर्धेला मुकणार..

Kane Williamson Injury Update: न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Ankush Dhavre

Kane Williamson May Ruled Out Of World Cup: सध्या भारतात आयपीएल २०२३ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. स्पर्धेतील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता.

या सामन्यात गुजरात टायटन्स संघातील फलंदाज केन विलियमसन दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला होता. आता न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केन विलियमसनला सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो या स्पर्धेतून बाहेर पडला होता. आता तो आगामी वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेतून देखील बाहेर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

केन विलियमसनची दुखापत इतकी गंभीर आहे की, त्याला आता डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे काही महिने तो क्रिकेट खेळताना दिसून येणार नाही.

केन विलियमसन हा न्यूझीलंड संघातील प्रमुख फलंदाज आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना न्यूझीलंड संघाने २०१५ आणि २०१९ मध्ये झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र दोन्ही स्पर्धांमध्ये न्यूझीलंड संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे.(Latest sports updates)

कसा झाला दुखापतग्रस्त?

आयपीएल २०२३ स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना चेन्नईच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती.

सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या केन विलियमसन उंच उडी मारत तो चेंडू थांबवला आणि मैदानाच्या आत फेकला. मात्र पाय मैदानाला स्पर्श होताच त्याचा तोल गेला ज्यामुळे तो गंभीर दुखापतग्रस्त झाला. त्याने आपल्या संघासाठी २ धावा वाचवल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

SCROLL FOR NEXT