RR VS PBKS IPL 2023 Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील आठवा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र हा निर्णय पंजाबच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवत तुफान फटकेबाजी केली आहे. शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग यांनी १० षटकात ९० धावा ठोकत चांगली सुरुवात करून दिली.
प्रभसिमरन बाद झाल्यानंतर भानुका राजपक्षे फलंदाजी करण्यासाठी आला. भानुका राजपक्षे केवळ १ चेंडू खेळून खेळपट्टीवर टिकून होता तितक्यात शिखर धवनने त्याला दुखापतग्रस्त केले.
शिखर धवनने इतका जोरात शॉट मारला होता की, भानुका राजपक्षेला हलण्याची संधीच नाही मिळाली. त्यामुळे चेंडू जाऊन त्याच्या उजव्या हाताला जाऊन लागला.
हा शॉट इतका जोरदार होता की, चेंडू लागल्यानंतर फिजिओला मैदानावर यावं लागलं. त्याच्या हाताला पट्टी बांधली मात्र त्याचा काहीच परिणाम जाणवला नाही.
शेवटी त्याला मैदान सोडावं लागलं. डाव्या हाताच्या या फलंदाजाने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ३२ चेंडूंमध्ये ५० धावांची खेळी केली होती. (Latest sports updates)
अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग 11:
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, सॅम कुरान, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.