Anrich Nortje Gets Shubman Gill Wicket: आयपीएल २०२३ स्पर्धेतील सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने जोरदार कामगिरी करत ११ चेंडू शिल्लक ठेवून ६ गडी राखून विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्स संघाचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे.
दरम्यान या सामन्यात एनरीच नॉर्खियाची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघातील वेगवान गोलंदाज एनरीच नॉर्खिया आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तर अचूक टप्प्यावर भन्नाट वेगाने गोलंदाजी करून विकेट मिळवण्यातही तो तरबेज आहे. अशीच काहीशी कामगिरी गुजरात टायटन्स विरुध्द झालेल्या सामन्यात पाहायला मिळाली आहे.
तर झाले असे की, गुजरात टायटन्स संघाची फलंदाजी सुरू असताना पाचवे षटक टाकण्यासाठी एनरीच नॉर्खिया गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिलाच चेंडू टप्पा पडून आत आला. ताशी १४८.३ किमी इतक्या गतीने टाकलेला हा चेंडू पॅडला लागून थेट यष्टीला जाऊन धडकला. त्यावेळी गिल १४ धावांवर फलंदाजी करत होता.(Latest sports updates)
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून डेव्हिड वॉर्नरने ३७ तर अक्षर पटेलने ३६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटक अखेर ८ गडी बाद १६२ धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाकडून साई सुदर्शनने सर्वाधिक नाबाद ६२ तर डेव्हिड मिलरने नाबाद ३१ धावांची खेळी करून गुजरातला हा सामना जिंकून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.