sarfaraz khan  saam tv
Sports

Kamran Akmal On Sarfaraz Khan: सरफराज खानच्या समर्थनात पाकिस्तानी खेळाडूने घेतली धाव; रोहितवर हल्लाबोल करत म्हणाला...

Sarfaraz Khan: देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या सराफराज खानला यावेळी देखील दुर्लक्ष केलं गेलं आहे.

Ankush Dhavre

Team India: येत्या काही दिवसात भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी भारतीय संघाची घोषणा देखील केली आहे. कसोटी मालिकेत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.

तर अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर पुजाराला बाहेर करून ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वालला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे.

मात्र गेल्या ३ वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या सराफराज खानला यावेळी देखील दुर्लक्ष केलं गेलं आहे.

सरफराज खानला संघात स्थान न मिळाल्याने अनेक दिग्गजांनी टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. सुनील गावसकरांनी देखील प्रश्न उपस्थिती केले होते. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने याबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

कामरान अकमलने आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना सरफराज खान, उमरान मलिक आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाबाबत वक्तव्य केलं आहे. सरफराज खानबाबत बोलताना तो म्हणाला की, 'भारतीय संघाची जेव्हा निवड होते, त्यानंतर एक किंवा दोन खेळाडू नेहमीच चर्चेत असतात. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे युवा फलंदाज सरफराज खान. मला माहितेय की, त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण आहे. मात्र तो संघात असायला हवा होता. त्याला संघात स्थान देण्याची ही उत्तम संधी होती. ' (Latest sports updates)

तसेच रोहित शर्माबाबत बोलताना तो म्हणाला की, 'वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मजबूत संघ निवडला गेला आहे. मला असं वाटतं की रोहितने या दौऱ्यावर नेतृत्वाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडावी. रोहितकडे स्वतःला सिद्ध करण्याची ही एक उत्तम संधी आहे. त्याला विराट कोहलीसारखं अॅक्टिव्ह राहावं लागेल. तसेच उमरान मलिकला देखील संघात संधी मिळायला हवी होती. त्याला तिथे स्विंग मिळाला असता.' असं कामरान अकमल आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'चं शूटिंग थांबवले अन् रिलीज डेटही पुढे ढकलली, कारण काय?

Divorce: घटस्फोटानंतर दुग्धाभिषेक, केक कापला; जंगी सेलिब्रेशन करणारा तरुण आहे तरी कोण?

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

SCROLL FOR NEXT