IND vs WI: आणखी काय करायला हवं? संघात निवड न झालेल्या सरफराजच्या इंस्टाग्राम स्टोरीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष- VIDEO

Sarfaraz Khan Instagram Story: सरफराज खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
sarfaraz khan
sarfaraz khan saam tv
Published On

Sarfaraz Khan: भारतीय संघ येत्या काही दिवसात वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

तर युवा भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वालला देखील कसोटी संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र रणजी ट्रॉफी स्पर्धेत धुमाकूळ घालणाऱ्या सरफराज खानला पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं गेलं आहे.

दरम्यान आता सरफराज खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

sarfaraz khan
Team India: टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाची कारकिर्द संपली? Asia Cup पाठोपाठ World Cup स्पर्धेलाही मुकणार..

सरफराज खानची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल..

सरफराज खानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत केलेल्या तुफानी खेळीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने काही कॅप्शन दिलं नाही. मात्र हा व्हिडिओ शेअर करत सरफराजने निवडकर्त्यांना प्रश्नच विचारला आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सरफराजची आकडेवारी एकदा पाहाच..

सरफराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने रणजी ट्रॉफी २०२३ स्पर्धेतील ९ सामन्यांमध्ये ५५६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ही ९२.६६ ची राहिली आहे. इतकेच नव्हे तर त्याने ३ वेळेस १०० धावांचा पल्ला देखील गाठला आहे.त्याची ही कामगिरी पाहता असे म्हटले जात होते की, त्याला भारतीय कसोटी संघात स्थान दिले जाऊ शकते. मात्र असं काहीच झालं नाही. (Latest sports updates)

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे १६ सदस्यीय कसोटी संघ (Team India Test Squad For West Indies Tour) :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, रवींद्र जडेजा. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे १६ सदस्यीय भारतीय संघ (Team India ODI Squad For West Indies Tour:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com